Homeक्राईमखराडी परिसरामध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा धक्कादायक प्रकार समोर

खराडी परिसरामध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा धक्कादायक प्रकार समोर

लोक वार्ता – राज राठोड

पुणे: शहरामध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. पोलिसांनी यावर वेळोवेळी कारवाई केली असली तरी काही ठिकाणी अजूनही अशा बोगस सेंटरचे जाळे पसरलेले आहे.  

खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नुकताच अशाच एका मसाज सेंटरवर छापा टाकण्यात आला. तपासात हे ठिकाण मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपींना अटक करून पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  

सविस्तर माहिती :पुणे शहरातील खराडी परिसरात ‘व्हाईट लोटस स्पा’ या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा काळा कारभार अखेर पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. मसाज सेंटरच्या आड वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर खराडी पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.

छाप्यात तरुन्नम मनसुर खान (वय ३३, रा. साई सहवास सोसायटी, वाडे बोल्हाई, ता. हवेली) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून त्यापैकी एक महिला परराज्यातील असल्याचे समजते. या प्रकरणात पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

‘व्हाईट लोटस स्पा’ हे खराडीतील तुळजाभवानी नगरमधील द स्पेस बिल्डिंगमध्ये चालवले जात होते. सौंदर्य व आरोग्याच्या नावाखाली महिलांना प्रवृत्त करून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी सांगितले की,या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अशा प्रकारच्या अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.  

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!