Homeक्राईमपुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर पोलिसांची नजर ; गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम

लोक वार्ता – राज राठोड

पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत राबविण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशान्वये करण्यात आली. फरासखाना, समर्थ, खडक, विश्रामबाग, डेक्कन आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

पोलिसांनी एकूण ४२ सार्वजनिक ठिकाणे, ब्लॅक स्पॉट्स आणि मोकळ्या मैदानांची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान सार्वजनिक शांततेस बाधा आणणाऱ्या तसेच अवैध कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात आली.

कारवाईचा आढावा :

🔹 भा.न्या.सं. कलम २८५ अंतर्गत – ३ गुन्हे दाखल

🔹 कोटपा कायद्यान्वये – १२ खटले

🔹 ट्रिपल सीट विरोधात – ३१ कारवाया

🔹 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत – २२ खटले

🔹 एन.डी.पी.एस. कायद्यान्वये – २ गुन्हे

🔹 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये – ४ गुन्हे

पोलिसांचा इशारा :

शहरातील सार्वजनिक ठिकाणी अवैध कृत्ये, अंमली पदार्थ विक्री, वाहतूक नियमांचे उल्लंघन यांसारख्या प्रकारांवर पुढेही अशाच धडक मोहिमा सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा सतर्कतेचा संदेश दिला आहे.

सदरची कारवाई ही मा.श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर मा.श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर मा. श्री. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुमे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. कृषिकेश रावले, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१ पुणे शहर व परिमंडळ-१ कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

विमाननगरात हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; १.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त : ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी कोंबिंग ऑपरेशनदरम्यान विमाननगर परिसरातील एका हुक्का पार्लरवर धडक...

error: Content is protected !!