Homeक्राईम५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

लोक वार्ता – राज राठोड 

पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच आरोपींना अटक करून पोलिसांनी ठेकेदाराची सुखरूप सुटका केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी खराडी येथील इराणी कॅफे हॉटेलसमोर आरोपींनी खडी क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखविण्याचा बहाणा करून संबंधित मेट्रो ठेकेदाराला आपल्या जाळ्यात ओढले. मुख्य आरोपी सागर झुरुंगे याने ठेकेदाराला जबरदस्तीने आपल्या पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीत बसवून अपहरण केले. त्यानंतर पुणे-नगर रोडवर नेत असताना इतर साथीदारांनी स्कॉर्पिओ गाडीतून येत त्याला मारहाण केली व शिवीगाळ केली.

यानंतर आरोपींनी ठेकेदाराला लोणीकंद, शिक्रापूर, सणसवाडी आणि रांजणगाव या परिसरात विविध ठिकाणी फिरवत ठेवले. या दरम्यान त्यांनी ठेकेदार व त्यांच्या वडिलांकडे फोन करून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. आरोपींनी पोलिसांची दिशाबूल करण्यासाठी

वारंवार वाहनांची अदलाबदल करत ठेकेदाराला एका बांधकाम साईटवर नेऊन दुसऱ्या गाडीत हलवले,

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. पेरणे परिसरात मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करून पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपींना वाहनांसह ताब्यात घेत ठेकेदाराची सुखरूप सुटका केली.

या प्रकरणी सागर दत्तात्रय झुरुंगे (वय ३९), विजय सुरेश वाळुंज (वय ३८), राजू विजयकुमार सहाणे (वय ३२), रुपेश शिवाजी गावडे (वय ३८) आणि प्रकाश ऊर्फ बाळू राउत (वय ३४) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी हे लोणीकंद व तुळापूर परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी आरोपींकडून दोन फॉर्च्यूनर, एक स्कॉर्पिओ व मोबाईल फोन असा सुमारे ४९लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या धाडसी कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलिसांनी अतिशय जलद व अचूक तपास करत गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे करत आहेत.

ही घटना शहरातील व्यावसायिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण करणारी ठरत असून, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोजकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. निखिल पिंगळे, मा. पोलीस उप-आयुक्त, परि-४, पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त खराडी विभाग, पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन श्री. संजय चव्हाण, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप-निरीक्षक, राहुल कोळपे, पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, मनोज खरपुडे, साहेबराव गुंडाळे, सुरज जाधव, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, विलास केदारी यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!