लोक वार्ता – राज राठोड
पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी कोंबिंग ऑपरेशनदरम्यान विमाननगर परिसरातील एका हुक्का पार्लरवर धडक कारवाई करत अवैध धंद्यांचा पर्दाफाश केला. या कारवाईत एकूण १,४७,५५० रुपयांचे हुक्का साहित्य व विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार परिमंडळ ०७ हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना पथकाला अॅटलान्टिस रूफ टॉप लाऊंज हॉटेल, विमाननगर येथे विनापरवाना हुक्का पार्लर चालवला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकला.

१) स्वप्निल शांताराम तांबे, वय ३२ वर्ष, रा. स्वस्तिक कोलो, उद्रे हॉस्पिटल जवळ, केसनंद फाटा, वाघोली, पुणे, २) अमेय मुकेश अजमीरे, वय २८ वर्ष, रा. पाम अटलांटिस, बावडी रोड, वाघोली, पुणे ३) नवरंग विठ्ठलराव कोल्हे, वय २८ वर्ष, रा. अटलांटिस रुफ टॉप लाउंज, रॉयल टॉवर, विमाननगर, पुणे, ४) अमितकुमार दयालजी गोयल, वय २६ वर्ष, रा. फॉरेस्ट एज, खराडी, पुणे, ५) कमरूल इस्लाम लष्कर, वय २६ वर्ष, रा. साईनाथ नगर, लेन नंबर १, खराडी, पुणे, ६) शिवमकुमार श्रीरामराज यादव, वय २३ वर्ष, रा. सदर, ७) माहरुफ अफताफउद्दीन आलम, वय १८ वर्ष, रा. सदर हे विनापरवाना हुक्का बार चालवत असल्याचे तसेच विदेशी दारूचा साठा करून विक्री करत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून हुक्का पॉट, विदेशी दारूच्या बाटल्या, इतर साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १,४७,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सर्व आरोपींविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २००/२०२६ नोंद करण्यात आला असून, त्यांच्यावर सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ तसेच महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात अवैध हुक्का पार्लर आणि दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त,.. श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे ३ श्री. शंकर खटके, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ श्री पंडीत रेजितवाड यांचे सुचनांप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक नितीन नाईक पोलीस अंमलदार शेख, पांडुळे, देवकाते, चव्हाण, सोनवणे, कळसकर, बास्टेवाड, तसेच महिला पोलीस अंमलदार माकडी यांनी केली आहे.




















