Homeक्राईमघरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल जप्त.

लोक वार्ता – राज राठोड 

पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १०३ गॅस सिलेंडरसह एक इसम ताब्यात घेण्यात आला असून सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास पथक गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, हांडेवाडी परिसरात एक व्यक्ती घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये गॅस ट्रान्सफर करत आहे.

सदर माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ काव्या मल्टी सर्व्हिसेस या दुकानावर छापा टाकला. दुकानाबाहेर उभी असलेल्या मारुती सुझुकी सुपर कॅरी टेम्पो (क्र. एमएच १४ केओ ७९१७) मध्ये घरगुती व व्यावसायिक गॅस टाक्या आढळून आल्या. दुकानाच्या आत तपासणी केली असता, एक इसम अत्यंत धोकादायक पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक व ५ किलोच्या टाक्यांमध्ये गॅस भरताना आढळून आला.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित इसमास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव नितीन हनुमंत होळकर (वय ३८, रा. हांडेवाडी, पुणे) असे सांगितले. गॅस साठवणुकीसाठी आवश्यक परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

या कारवाईत पोलिसांनी १०३ गॅस सिलेंडर आणि एक चारचाकी वाहन असा एकूण १०,०९,३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६४/२०२६ नोंद करण्यात आला असून अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध गॅस व्यवसायावर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास काळेपडळ पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर, अतुलकुमार नवगिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, यांचे सुचनेप्रमाणे सहा. पो. निरी. अमित शेटे, पो.हवा.प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, प्रदिप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

विमाननगरात हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; १.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त : ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी कोंबिंग ऑपरेशनदरम्यान विमाननगर परिसरातील एका हुक्का पार्लरवर धडक...

error: Content is protected !!