Homeक्राईमसासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

लोक वार्ता – राज राठोड
पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कल्याण येथील ५० वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, तिची मुलगी सुवर्णा सर्जेराव जाधव (वय ३३, रा. शेळके वस्ती, अप्पर बिबवेवाडी) ही सासरी राहत असताना सासरच्या लोकांकडून तिला वारंवार छोट्या-मोठ्या कारणावरून शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात होता.

हा छळ सन २०१६ पासून सुरू असल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून सुवर्णा जाधव यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले.

या घटनेनंतर बिबवेवाडी पोलिसांनी कारवाई करत मयत महिलेच्या सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पती सर्जेराव जाधव (वय ३८), सासरे माणिक जाधव (वय ७०), सासू जयश्री जाधव (वय ६५) तसेच लक्ष्मी कांबळे, पुष्पा लोंढे, रोहन लोंढे आणि अनुराधा जाधव यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

सासरच्या छळामुळे त्रस्त झालेल्या महिलेने आत्महत्या केल्याची ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

घरगुती छळामुळे पुन्हा एकदा एका महिलेचा बळी गेल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

विमाननगरात हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; १.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त : ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी कोंबिंग ऑपरेशनदरम्यान विमाननगर परिसरातील एका हुक्का पार्लरवर धडक...

error: Content is protected !!