Homeक्राईमवाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोक वार्ता – राज राठोड 

पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना सातव वस्ती रोडवरील आशियाना लॉज परिसरात संशयित कार आढळली. पोलिसांनी चौकशी केली असता योगेश सुभाष कणगरे (वय ३८, रा. लोहगाव) याच्याकडे ५ ग्रॅम ४ मिलीग्रॅम एम.डी. पावडर व चारचाकी गाडी असा मुद्देमाल आढळून आला.

तपासादरम्यान कणगरे याने ही ड्रग्ज त्याचा साथीदार सोनू सिंह उर्फ मनुवेंद्र सिंह (वय ४२, रा. टिंगरेनगर) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी सोनू सिंह याला अटक केली. त्याच्याकडून ८ ग्रॅम ७ मिलीग्रॅम एम.डी., दुचाकी व मोबाईल जप्त करण्यात आले.

पुढील तपासात त्याच्या घर व कारची झडती घेतली असता आणखी २३ ग्रॅम २ मिलीग्रॅम एम.डी. पावडर तसेच महागडी कार जप्त करण्यात आली.

या कारवाईत एकूण ३७ ग्रॅम ३ मिलीग्रॅम एम.डी., दोन कार, एक दुचाकी व मोबाईल असा ३१.०६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ ७, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग पुणे शहर श्री. नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली श्री. नंदकुमार गायकवाड पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती पल्लवी मेहेर वाघोली पोलीस स्टेशन, सहा. पोलीस निरीक्षक, विनायक अहिरे, तपास पथक अधिकारी पोउपनि/मनोज बागल, पोलीस उपनिरीक्षक राहूल कोळपे खराडी पो.स्टे. पुणे शहर, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे, अमोल ढोणे लोणीकंद पो.स्टे. यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

विमाननगरात हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; १.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त : ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी कोंबिंग ऑपरेशनदरम्यान विमाननगर परिसरातील एका हुक्का पार्लरवर धडक...

error: Content is protected !!