Homeक्राईमपुण्यात पिस्टल तस्करीचा पर्दाफाश; ३ गावठी पिस्टल व १३ जिवंत काडतुसे जप्त,...

पुण्यात पिस्टल तस्करीचा पर्दाफाश; ३ गावठी पिस्टल व १३ जिवंत काडतुसे जप्त, तिघे ताब्यात

लोक वार्ता – राज राठोड

पुणे शहरात अवैध अग्नीशस्त्र तस्करीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत गुन्हे शाखा युनिट–५ने मोठी कारवाई करत गावठी बनावटीची तीन पिस्टले आणि तेरा जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. पिस्टल विक्रीसाठी आलेला एक आरोपी आणि ती खरेदी करणारे दोन आरोपी अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुणे शहरात वाढत्या अग्नीशस्त्र तस्करीच्या पार्श्वभूमीवर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून सातत्याने सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक युनिट–५ श्री. छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट–५चे पथक अवैध अग्नीशस्त्र व्यवहाराबाबत गोपनीय माहिती संकलित करत होते.

दि. १६ जानेवारी २०२६ रोजी पोलिस अभिलेखावरील आरोपी गौस ऊर्फ निहाल गब्बर मोमीन (वय ३६, रा. आझाद कॉलनी, उस्मानिया मोहल्ला, इदर्गाह जवळ, मिरज, जि. सांगली) हा हडपसर परिसरात गावठी पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार शशिकांत नाळे व गणेश माने यांना मिळाली. या माहितीनुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार काळेबोराटे नगर येथील अग्निशामक दलाजवळ सापळा रचण्यात आला.

सापळ्यादरम्यान पिस्टल विक्रीसाठी आलेला गौस ऊर्फ निहाल गब्बर मोमीन आणि त्याच्याकडून पिस्टल खरेदी करणारे अजय अरुण गायकवाड (वय २७, रा. भोसले वस्ती, म्हाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे) व सुनिल नागेंद्र जमादार (वय १९, रा. फ्लॅट नं. सी/१७, द्वारका सेक्टर २ ए, म्हाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान आरोपी गौस ऊर्फ निहाल गब्बर मोमीन याच्याकडून १ गावठी पिस्टल व ५ जिवंत काडतुसे, तर आरोपी अजय अरुण गायकवाड याच्याकडून २ गावठी पिस्टले व ८ जिवंत काडतुसे असा एकूण ३ गावठी बनावटीची पिस्टले आणि १३ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

आरोपी गौस ऊर्फ निहाल गब्बर मोमीन व अजय अरुण गायकवाड हे दोघेही पोलिस अभिलेखावरील आरोपी असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत मारहाण, तोडफोड तसेच खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार शशिकांत नाळे, गणेश माने, प्रताप गायकवाड विनोद शिवले, प्रमोद टिळेकर, अकबर शेख, राहुल ढमढेरे, अमित कांबळे, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, तानाजी देशमुख, शहाजी काळे, प्रशांत कर्णवर, अविनाश इंगळे, नानासाहेब मोरे, अमर चव्हाण, नेत्रिका अडसुळ, नासिर देशमुख व परमेश्वर कदम यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!