Homeक्राईमहरवलेले मोबाईल शोधून पोलीसांनी मूळ मालकांच्या हाती परत दिले

हरवलेले मोबाईल शोधून पोलीसांनी मूळ मालकांच्या हाती परत दिले

लोक वार्ता –राज राठोड 

पुणे जिल्ह्यातील वाघोली, लोणीकंद व लोणीकाळभोर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हरवलेले मोबाईल फोन शोधून काढण्यात गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलीस कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  

मा. वरिष्ठांच्या सूचनेनुसार हरवलेले मोबाईल शोधण्याचे विशेष अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत पोलीस हवालदार सारंग दळे व महिला पोलीस अंमलदार सोनाली नरवडे यांनी सीईआयआर पोर्टलवरील माहिती संकलित करून तांत्रिक तपासणी केली. संगणक विभागातील महिला पोलीस अंमलदार तरंगे यांच्या मदतीने मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.

या तपासातून विविध कंपन्यांचे अंदाजे ५ लाख ११ हजार किंमतीचे एकूण २५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. सदर मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याची प्रक्रिया सुरू असून, नागरिकांनी पोलिसांच्या आभार मानले आहे.

पुणे पोलिसांनी सांगितले की, हरवलेले मोबाईल शोधून परत मिळवून देणे ही पोलीसांची जनतेप्रती असलेली जबाबदारीची जाणीव आहे. नागरिकांनी मोबाईल हरवल्यास त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी व सीईआयआर पोर्टलचा वापर करावा.  

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण गुन्हे शाखा युनिट-६ यांचे सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा, युनिट ६ कडील पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, विनायक साळवे, नेहा तापकीर, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!