लोक वार्ता –राज राठोड
१६ ऑक्टोबर २०२५ रोजी बुधवार पेठ, पुणे येथील प्रिसियस रिफायनरी दुकानातील लॉकरमधून १० नग सोन्याचे बिस्कीट (एक किलो शुद्ध सोने) चोरी झाल्याची तक्रार फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस उप-आयुक्त श्री. कृषिकेश रावले यांनी प्रभारी अधिकारी उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार केले.
या पथकात पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे व अंमलदारांचा समावेश होता.
आरोपी: प्रथमेश गणेश मंडले (वय १८, रा. पाचेगाव बुद्या, ता. सांगलो, जि. सोलापुर) आरोपीने मोबाईल बंद ठेवून व वारंवार ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होता, सातारा, सांगली, सोलापुर, कोल्हापुर, विजापुर (कर्नाटक), विजयवाडा (आंध्रप्रदेश) अशा अनेक ठिकाणी त्याचा पाठलाग करण्यात आला. अखेर जत, जि. सांगली येथून २९ ऑक्टोबर रोजी त्याला अटक करण्यात आली.
तपासात आरोपीने काही सोने वेगवेगळ्या ठिकाणी लपवले असल्याचे व काही सोने कोल्हापुरातील कारागीर शकील बशीर मोमीन (वय ४५, रा. छावा गल्ली, कोल्हापुर) याला विकले असल्याचे उघड झाले. शकील मोमीनलाही १० नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. एकूण १ कोटी २७ लाख रुपये किंमतीचे संपूर्ण एक किलो सोने पोलिसांनी हस्तगत केले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व व पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परि-१ पुणे श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक (अति. कार्य.) श्री. उत्तम नामवाडे यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अंमलदार कुष्णा निढाळकर, महेबुब मोकाशी, नितीन तेलंगे, गजानन सोनुने, नितीन जाधव, चेतन होळकर, अर्जुन कुडाळकर, तानाजी नांगरे, महेश राठोड, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, महेश पवार, शशीकांत ननावरे, सुमित खुट्टे, प्रशांत पालांडे व मनिषा पुकाळे यांनी केलेली आहे.




















