लोक वार्ता – राज राठोड
पुणे : शहरातील डेक्कन परिसरात मध्यरात्री घडलेल्या दरोड्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे. डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अनंत रेस्टॉरंट आणि बारमध्ये कोयतेधारी टोळीने,१.३० वाजताच्या सुमारास अनंत रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करत दहशत निर्माण केली. काही क्षणातच ही टोळी रेस्टॉरंटमध्ये धुमाकूळ घालत दरोडा टाकून पसार झाली. घटनेदरम्यान उपस्थित कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण झाले होते.
धारदार कोयत्याचा धाक दाखवून दहशत पसरवत टोळीने दरोडा टाकला, काउंटर मधील पैसे घेऊन आरोपी पसार झाले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र सुदैवाने कोनालाही दुखापत झाली नाही. दरोड्याची माहिती मिळताच डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले,
घटनेनंतर लगेचच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक सूत्रांकडून, आणि टोळीच्या हालचालींचा तपास सुरू केला आहे. डेक्कन पोलिसांचे पथक आरोपींचा पाठलाग करत असून ही टोळी नेमकी कुठून आली आणि कोणत्या उद्देशाने दरोडा टाकला, याचा तपास वेगाने सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार. डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अनंत रेस्टॉरंट आणि बारमध्ये, रात्री १.३० वाजताच्या दरम्यान, ४ दरोडेखोर आले त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून काउंटर मध्ये ठेवलेले २० हजार रुपये घेऊन गेले, चारी आरोपींनी पहिले आनंद रेस्टॉरंट याची रेकी केली, त्यानंतर दीडच्या सुमारास येऊन त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून, दरोडा टाकला आहे. पोलिसांनी सांगितलेकी, दरोड्यातील आरोपींना आम्ही लवकरात लवकर अटक करू. अशी माहिती पोलिसांन कडून मिळाली आहे,




















