Homeक्राईमलिव्ह इन रिलेशन आणि निर्घृण खुन : पुणे हादरले : किरकोळ वादातून...

लिव्ह इन रिलेशन आणि निर्घृण खुन : पुणे हादरले : किरकोळ वादातून वडील– मुलाकडून बेघर महिलेची निर्घृण हत्या; मृतदेह २-३ दिवस घरी ठेवून रस्त्याच्या कडेला फेकले

लोक वर्ता – राज राठोड

पुणे : शहरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेल्वे स्टेशनवर भेटलेल्या एका ४० वर्षीय बेघर महिलेची वडील–मुलाने निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. येरवडा येथील घरात २ ते ३ दिवस मृतदेह लपवून ठेवून, नंतर तो रस्त्याच्या कडेला फेकल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

लोहेगाव परिसरात दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा कुजलेल्या अवस्तेत मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता. मृत महिलेची ओळख पटत नसल्याने पोलिसांना मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र अखेर सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी संशयितांचा शोध घेत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

अटक आरोपी :

रवी रमेश साबळे, वय.३५

रमेश रामचंद्र साबळे, वय.६५

दोघेही रहिवासी : जिजामाता नगर, येरवडा

पोलीस तपासानुसार, मृत महिलेची ओळख सुवर्णा वय, ४० अशी पटली आहे. दोन महिन्यांपूर्वी सुवर्णा आणि रवी यांची भेट पुणे रेल्वे स्टेशनवर झाली होती. दोघेही दिवसभर मजुरी करून जगत होते. हळूहळू सुवर्णा रवीच्या घरी राहू लागली. परंतु किरकोळ कारणावरून दोघांत वारंवार वाद व्हायचे.

हा वाद वाढत गेला आणि अखेर रवि व त्याच्या वडिलांनी रागाच्या भरात वीट व काठीने सुवर्णावर हल्ला केला. गंभीर मारहाण झाल्यामुळे सुवर्णाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घाबरलेल्या आरोपींनी मृतदेह घरातच लपवून ठेवला. दोन-तीन दिवसांनी मृतदेहाचे विघटन सुरू झाल्यावर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून रिक्षाने लोहेगाव–वाघोली रोडवरील स्मशानभूमीजवळ टाकून दिला.

मंगळवारी सकाळी स्थानिक रहिवाशांना महिलेचा मृतदेह दिसल्याने त्यांनी एअरपोर्ट पोलिसांना खबर दिली.

सीसीटीव्हीने मोकळा केला गुन्ह्याचा गुंता:

पीएसआय नितीन राठोड यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, दिवे बंद असलेली संशयास्पद रिक्षा दिसून आली. तिचा मागोवा घेत पोलिसांनी येरवड्यातील यशवंत नगर येथे रविला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आला. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.

एसीपी प्रांजली सोनवणे यांनी दिलेली माहिती:

त्यांच्या म्हणण्यानुसार, मृत महिला बेघर होती. पूर्वी ती भोपाळमध्ये, नंतर मुंबई आणि मग पुणे स्टेशनवर राहत होती. दोन महिन्यांपूर्वी आरोपी रवीशी तिची मैत्री झाली आणि ती त्याच्या घरी राहू लागली. किरकोळ वादातून ही भीषण घटना घडली असून वडील–मुलाने मिळून पुरावे लपविण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!