लोक वार्ता – राज राठोड
पुणे : दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील आरोपींच्या हालचालीवर नजर ठेवण्याचे व पेट्रोलिंग करून हद्दीत गस्त वाढवण्याचे आदेशव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिले होते, त्याच अनुषंगाने सहा. पोलीस निरीक्षक राहुल नामदे व पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सद्दाम शेख व स्वप्निल घुगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली.

या कारवाईत आरोपी भिमराव नरसप्पा मानपाडे (वय २४, रा. साईनगर, गुलाबनगर, धनकवडी, पुणे) याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व २जिवंत काडतुस, ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,
आरोपी याने पिस्टल कोठून आणले, पिस्टल बाळगून गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होता का?. अशा अनेक प्रश्नांवर पर्वती पोलीस पुढील तपास करत आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-३ पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे शहर श्रीमती सुजाता तानवडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सद्दाम शेख, स्वप्निल घुगे, सुर्या जाधव, अमोल दबडे, किर्ती भोसले, राकेश सुर्वे, नानासाहेब खाडे, अमित चिव्हे व समिर जोशी यांनी केली आहे.




















