Homeक्राईम३ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी, केसनंद,वाघोली येथून अखेर...

३ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी, केसनंद,वाघोली येथून अखेर जेरबंद

लोक वार्ता –राज राठोड

पुणे : संघटित गुन्हेगारीविरोधातील (मोक्का) गंभीर गुन्ह्यात मागील तब्बल तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस बंडगार्डन पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. ससून रुग्णालय परिसरात तलवार, कोयता व पिस्टलच्या साहाय्याने जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या थरारक घटनेतील हा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या मोक्का केस क्र. ०६/२०१६ मध्ये आरोपी असलेले फिर्यादी तुषार हनुमंत हंबीर (वय ३५, रा. गोधळनगर, हडपसर) हे येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. चालता येत नसल्याने त्यांना २५ ऑगस्ट २०२२ रोजी उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला असतानाही ५ अनोळखी इसमांनी थेट ससून हॉस्पिटलमधील इन्फोसिस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला.

हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत फिर्यादीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी फिर्यादीचा बचाव करण्यासाठी पुढे आलेले पोलीस गार्ड व फिर्यादीचा मेहुणा यांनाही हल्लेखोरांनी जखमी केले. इतकेच नव्हे तर एका आरोपीने पिस्टलमधून गोळी झाडण्याचा प्रयत्न करून थरार निर्माण केला होता. या घटनेनंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात, गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान एकूण १२ आरोपी निष्पन्न करण्यात आले. त्यापैकी ११ आरोपींना अटक करून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. मात्र रोहित ऊर्फ तम्मा सुरेश धोत्रे (वय २६, रा. शिवांजली मित्र मंडळाजवळ, वडारवाडी, पुणे) हा आरोपी गुन्हा दाखल होताच फरार झाला होता.

मा. सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग पुणे शहर श्रीमती संगिता शिंदे अल्फोन्सो यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन श्री. संतोष पांढरे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक सातत्याने आरोपीचा शोध घेत होते. अखेर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार केसनंद, वाघोली परिसरातून या फरार आरोपीस ताब्यात घेण्यात आले. दिनांक १२/१२/२०२५ रोजी त्यास अधिकृतरीत्या अटक करण्यात आली आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग श्रीमती संगिता शिंदे अल्फोन्सो या करीत आहेत.

सदरची कामगिरी, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. राजेंद्र बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग श्रीमती संगिता शिंदे अल्फोन्सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) निलकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!