Homeक्राईमजांभुळवाडी कात्रज तलाव परिसरात गुन्हे शाखेची झडप; लोखंडी हत्यारे जप्त : धारदार...

जांभुळवाडी कात्रज तलाव परिसरात गुन्हे शाखेची झडप; लोखंडी हत्यारे जप्त : धारदार शस्त्रांसह तिघांना अटक

लोक वार्ता –राज राठोड
पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट २ व कॉप्स २०२४ मार्शल पथकाने आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत उल्लेखनीय कारवाई केली. गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान जांभुळवाडी कात्रज तलावाच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या बुलेट दुचाकीवर संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग सुरू केला.

मार्शलवरील अंमलदार अभिजीत बाठे व सागर खंडाळे यांनी धाडसाने तिन्ही संशयितांना अडवले. चौकशीत त्यांच्या ताब्यातून दोन लोखंडी धारदार हत्यारे आढळून आले. पोलिसांनी तातडीने शस्त्रे व बुलेट दुचाकी जप्त केली.

सविस्तर माहिती अशी की :
आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत कॉप्स २०२४ मार्शल यांनी केलेल्या सतर्क व धाडसी कारवाईमुळे संभाव्य गुन्हा उघडकीस आला आहे. दिनांक १७/१२/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट–२ कडील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच कॉप्स २०२४ मधील मार्शल आंबेगाव परिसरात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत होते.

यावेळी आंबेगाव पोलीस स्टेशनकडील मार्शलवरील पोलीस अंमलदार अभिजित बाठे व सागर खंडाळे यांच्या समोरून जांभुळवाडी–कात्रज तलावाच्या दिशेने बुलेट दुचाकी (क्रमांक MH 12/KX/9080) वरून तीन इसम भरधाव वेगाने जाताना दिसून आले. संशय बळावल्याने मार्शलवरील अंमलदारांनी तत्काळ पाठलाग करून जांभुळवाडी तलावाजवळ सदर दुचाकी थांबवली.

थांबवून चौकशी केली असता संशयितांनी आपली नावे
१) प्रथमेश नितीन पंडीत (वय २३, रा. अष्टविनायक मंडळाजवळ, आंबेगाव, पुणे),
२) निखिल बापू गायकवाड (वय २१, रा. सदर),
३) दिपक गणेश गायकवाड (वय १९, रा. सदर)
अशी सांगितली.

अधिक तपासणीदरम्यान या तिघांकडे दोन लोखंडी धारदार हत्यारे मिळून आली. बंदी असताना धारदार शस्त्रे जवळ बाळगून भरधाव वेगाने दुचाकी चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत धारदार हत्यारे व बुलेट दुचाकी जप्त केली.

या प्रकरणी आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३५८/२०२५ अन्वये शस्त्र अधिनियम ४/२५ तसेच मोटार वाहन अधिनियम ३(१), १८१, १२८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा-१ पुणे शहर श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार अभिजीत बाठे, सागर खंडाळे व युनिट २ कडील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!