लोक वार्ता –राज राठोड
पुणे | भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश; २० लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त, ६ गुन्हे उघडकीस.
पुणे शहरात कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभास अभिवादनासाठी येणाऱ्या भाविकांच्या मोठ्या गर्दीचा तसेच बसस्टॉप व इतर गर्दीच्या ठिकाणांचा गैरफायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहरने जेरबंद केले आहे.

शहरातील चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्याबाबत मा. वरिष्ठांकडून स्पष्ट आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस अंमलदार कारखेले, मुंडे, साळवे, ताकवणे व व्यवहारे यांच्या पथकाने सातत्याने गोपनीय व तांत्रिक माहिती संकलित करून संशयित आरोपींच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली.
दि. १८/१२/२०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार युनिट ६ च्या पथकाने कारवाई करत
१) सुभाष चंद्रकांत जाधव (वय ३९, रा. शिरापुर धुमाळ, ता. शिरूर, जि. बीड व कालिकानगर, जि. बीड)
२) लहु संतराम गायकवाड (वय ३०, रा. रायमोह, ता. शिरूर, जि. बीड)यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतल्यानंतर आरोपींकडून कौशल्यपूर्ण तपास करण्यात आला असता, त्यांच्या ताब्यातून एकूण १६७ ग्रॅम वजनाचे, अंदाजे २० लाख ४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ६ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
उघडकीस आलेले गुन्हे पुढीलप्रमाणे –
वाघोली पोलीस स्टेशन १ गुन्हा.
लोणीकंद पोलीस स्टेशन २ गुन्हे.
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन १ गुन्हा.
हडपसर पोलीस स्टेशन १ गुन्हा.
स्वारगेट पोलीस स्टेशन १ गुन्हा.
ही टोळी गर्दीचा फायदा घेऊन अत्यंत चपळाईने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखा युनिट ६ च्या या यशस्वी कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत असून, पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ कडील पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरी. मदन कांबळे, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, विनायक साळवे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, नितिन धाडगे, सोनाली नरवडे व प्रतिक्षा पानसरे यांनी केली आहे.




















