Homeक्राईमटेम्पोचा पाठलाग करून १,१५० लिटर गावठी हातभट्टी दारुसह ४ आरोपी जेरबंद: ५...

टेम्पोचा पाठलाग करून १,१५० लिटर गावठी हातभट्टी दारुसह ४ आरोपी जेरबंद: ५ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त

लोक वार्ता – राज राठोड

पुणे: शहरात बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूच्या वाहतुकीविरोधात वानवडी पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करत तब्बल १,१५० लिटर गावठी हातभट्टी दारूसह चार आरोपींना जेरबंद केले.

वानवडी पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार दया शेगर व अमोल पिलाने यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गावठी हातभट्टी दारूची मोठ्या प्रमाणावर टेम्पोतून वाहतूक होणार आहे. माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून तपास पथक सक्रिय झाले.

दरम्यान, संशयित टेम्पो घोरपडी, पुणे परिसरात जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नमूद ठिकाणी सापळा रचत संशयित वाहन थांबवले. तपासणीदरम्यान टेम्पोमध्ये चार इसम आढळून आले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पुढीलप्रमाणे नावे व पत्ते सांगितले – १)लियाकत रोहीत अब्बासी (वय ३२), रा. ढोबरवाडी, सोपानबाग, पुण. २)श्रीकांत बापु साबळे (वय २१), रा. सोरतापवाडी फाटा, ऊरळी कांचन. ३) संकेत विजय वाबळे वय १९. ४)विशाल दुर्योधन संगोडिया (वय १८), रा. गाडामुडी गाव, यवत, पुणे

अधिक तपासात मुख्य आरोपी लियाकत रोहीत अब्बासी याने पुणे शहरात गावठी हातभट्टी दारू सहज उपलब्ध होत नसल्याने, ती यवत येथून आरोपी विशाल संगोडिया यांच्या वडिलांकडून तयार स्वरूपात खरेदी करून टेम्पोमध्ये भरल्याची कबुली दिली.

टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये ३५ लिटर क्षमतेचे एकूण ३३ प्लास्टिक कॅन, असे एकूण १,१५० लिटर गावठी हातभट्टी दारू आढळून आली. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेला चारचाकी टेम्पो असा एकूण ५ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख हे पुढील तपास करीत आहेत. अवैध दारूविक्री व वाहतुकीविरोधातील ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरत असून, वानवडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई पार पडली आहे 

सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्रीमती. नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पो. स्टे. पुणे शहर श्री. भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता जाधव यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णु सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले व अर्षद सय्यद, या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!