लोक वार्ता –राज राठोड
पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट–५ ने मोठी कारवाई करत टिपू पठाण टोळीतील मोका अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील दोन पाहिजे आरोपींना परराज्यातून जेरबंद केले आहे. हे आरोपी मागील काही काळापासून पोलीस अभिलेखावर फरार होते.

पुणे शहरातील पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट–५ चे पथक सातत्याने फरार आरोपींचा माग काढत होते.

काळेपडळ पोलीस स्टेशनमधील गंभीर गुन्हा
काळेपडळ पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर ४०४/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहितेतील कलम ३०८ (२)(३)(४), १२६(२), १८९(२), १९०, ३५२, ३५१(३), ३२९(३), ६१(२) तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) अन्वये गुन्हा दाखल आहे.
या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी :
साजीद झिब्राइल नदाफ, वय २७ वर्षे,
रा. स. नं. ०५, वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे.
इरफान नासीर शेख, वय २७ वर्षे,
रा. सय्यदनगर, गल्ली नं. १७, आयशा मस्जिद शेजारी, हडपसर, पुणे
हे दोन्ही आरोपी फरार होते.
पोलीस अंमलदार गणेश माने, नासेर देशमुख व परमेश्वर कदम यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी साजीद नदाफ हा वेताळबाबा वसाहत परिसरात, तर आरोपी इरफान शेख हा सय्यदनगर, आयशा मस्जिद परिसरात येणार आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट–५ च्या पथकाने तात्काळ सापळा रचून — साजीद झिब्राइल नदाफ यास वेताळबाबा वसाहत, मंदिराजवळून
इरफान नासीर शेख यास सय्यदनगर, आयशा मस्जिद शेजारील रोडवरून
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी काळेपडळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येणार असून, या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे शाखा युनिट ५, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार गणेश माने, नासेर देशमुख व परमेश्वर कदम यांचे पथकाने केली आहे.




















