लोक वार्ता –राज राठोड
पुणे | प्रेमसंबंधातून गावावरुन आपल्या प्रेयसीला पळवून घेऊन आल्याच्या रागातून तरुणीच्या भावाने पुण्यात येऊन मित्राच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात वार करुन त्याचा निर्घृण खुन केला. जावेद पठाण याचे संदिप भुरके याच्या मोठ्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध होते. १०-१२ दिवसांपूर्वी जावेद हा गावाला गेला होता. तेथून तो संदिप भुरके याच्या बहिणीला घेऊन पळून पुण्यात आला होता. त्याचा राग मनात धरुन संदिप भुरके व त्याचा मित्र पुण्यात आले. त्यांना जावेद कोठे काम करतो, याची माहिती होती. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजता चे दरम्यान ते गायमुख चौक आंबेगांव बुद्रुक, गुरुदत्त वॉशिंग सेंटर येथे आले. त्यांनी जावेद पठाण याच्याबरोबर वाद घातला. वाद वाढताच संदिप भुरके याने हातातील हत्याराने जावेदच्या डोक्यात व हातावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जावेदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या संदर्भात आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता, आंबेगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींना, चिखलवाडी, प्रफुलनगर, ता. भोकर, नांदेड येथून ताब्यात घेतले आहे, आरोपींची नावे १) संदिप रंगराव भुरके, वय-२५ वर्षे, २) ओमप्रसाद ऊर्फ दत्ता गणेश किरकन, वय २० वर्षे दोघेही रा. चिखलवाडी, प्रफुलनगर, ता. भोकर, नांदेड, अशी आहे. त्यानंतर त्यांना आंबेगांव पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचेकडे कसोशीने तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याबाबत पोलीस निरीक्षक गुन्हे श्री गजानन चोरमले तपास करीत आहे. मा. न्यायालयाने नमूद आरोपींची दिनांक ०१/०१/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर मा. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त मा. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे मा. राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे श्री मिलींद मोहिते, सहा. पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोनि गुन्हे गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरिश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे यांच्या पथकाने केली




















