लोक वार्ता –राज राठोड
पुणे : पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत चारचाकी पिकअप वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी शिताफीने अटक करत तब्बल १४ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. १९/१२/२०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या ताब्यातील सुमारे ९ लाख रुपये किमतीची. महिंद्रा पिकअप व त्यामधील ५ लाख २९ हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकूण १४ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तपासाला वेग दिला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील अनेक ठिकाणांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, तसेच तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास पुढे नेला.
तपास पथक प्रभारी अधिकारी श्री. किरण पवार व तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक व स्वप्निल घुगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे सापळा रचून आरोपी शिवा मिठ्ठलाल यादव (वय २० वर्षे, रा. काळुबाई मंदिराजवळ, वरद अपार्टमेंट, जाधव वस्ती, चिखली, पुणे) यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडून चोरीस गेलेली. महिंद्रा पिकअप व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बॉक्स असा एकूण १४ लाख ०९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पर्वती पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि-०२ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर सहा. पोलीस निरी, श्री. राहुल नामदे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक श्री. किरण पवार, पोलीस अंमलदार सदाशिव कोपनर, प्रकाश मरगजे, प्रविण जगताप महेश मंडलिक, स्वप्निल घुगे, सुर्या जाधव, सद्दाम शेख, मनोज बनसोड, अमोल दबडे, अमित विव्हे, नाना सोखाडे, राकेश सुर्वे व किर्ती भोसले यांनी केली.




















