Homeक्राईमतळजाई वसाहत लुंकड शाळा परिसरात वाहनांची तोडफोड, सहकारनगर पोलिसांकडून तत्पर कारवाई :...

तळजाई वसाहत लुंकड शाळा परिसरात वाहनांची तोडफोड, सहकारनगर पोलिसांकडून तत्पर कारवाई : दोघे ताब्यात 

लोक वार्ता – राज राठोड

पुणे : तळजाई वसाहतीलगत असलेल्या लुंकड शाळा परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली. काल रात्री ३ वाजण्याच्या सुमारास तीन जणांनी लाकडी दांडके व बांबूच्या सहाय्याने परिसरातील उभ्या वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी एक अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लुंकड शाळेजवळ शेकोटी करत असताना त्यांचा एक नातेवाईक तेथे आला. त्याच्यासोबत आणखी दोन जण होते. या तिघांनी फिर्यादीला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे फिर्यादी तेथून निघून गेले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास केला असता, वाहनांची तोडफोड करणारे आरोपी हे फिर्यादीचेच नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले. घरगुती भांडणातून सुरू झालेला वाद पुढे हिंसक वळण घेत, परिसरातील वाहनांवर संताप व्यक्त करत तोडफोड करण्यात आली.

सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “फिर्यादी आणि मुख्य आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. घरगुती वादातून मुख्य आरोपीने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी निघून गेल्यावर, तिघांनी मिळून लाकडी दांडके व बांबूने परिसरातील वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणात आम्ही तीन आरोपींची ओळख पटवली असून, त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आहे.”पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!