Homeक्राईमगावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त; आंबेगाव पोलिसांची कारवाई

गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त; आंबेगाव पोलिसांची कारवाई

लोक वार्ता – राज राठोड

​पुणे: आंबेगाव पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला २३ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, २१ जानेवारी २०२६ रोजी आंबेगाव पोलीस स्टेशनचे अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते आणि प्रगोद भोसले यांना बातमी मिळाली की, स्वामी नारायण मंदिराजवळ, सर्विस रोडवर, आंबेगाव खुर्द, पुणे येथे एक व्यक्ती थांबला असून त्याच्याजवळ अग्निशस्त्र आहे. ही माहिती त्यांनी वरिष्ठांना कळवली असता, वरिष्ठांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

​त्यानुसार, आंबेगाव पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मिळालेल्या माहितीची खात्री करून सुयश सोमनाथ घोडके (वय २४, काम-शेती, रा.अभिनव कॉलेज जवळ, नऱ्हे पुणे) याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून अंदाजे ४१,००० रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
​आरोपी सुयश घोडके याला आंबेगाव पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २७/२०२६, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (२) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला दाखल गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला २३ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास तपासी अधिकारी मोहन कळमकर, पोलीस उपनिरीक्षक करत आहेत.
​या आरोपीविरुद्ध यापूर्वीही वालचंद नगर पोलीस स्टेशन, ता. इंदापूर, पुणे ग्रामीण येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर मा. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त मा. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे मा. राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे श्री मिलींद मोहिते, सहा. पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोनि गुन्हे गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरिश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!