Homeक्राईम​अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई: ६ ठिकाणी छापे टाकून ई-सिगारेट आणि हुक्का...

​अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई: ६ ठिकाणी छापे टाकून ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरचा साठा जप्त,

लोक वार्ता –राज राठोड

पुणे: शहरात बेकायदेशीरपणे विक्री केल्या जाणाऱ्या प्रतिबंधीत ई-सिगारेट (वेप) आणि तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरविरुद्ध पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडाकेबाज कारवाई केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली, शहरात एकूण ६ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी ८ लाख ३२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ३ जणांना ताब्यात घेतले आहे.

पुणे शहरात काही दुकानदार लपून-छपून प्रतिबंधीत ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने लष्कर, कोरेगाव पार्क आणि कोथरुड या परिसरात ही धडक मोहीम राबवली.

​गुन्हे आणि जप्त मुद्देमाल:

​या कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे आणि खटले दाखल केले आहेत:

​लष्कर आणि कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन: येथे ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९’ च्या कलम ७ व ८ नुसार ०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​कोथरुड आणि लष्कर पोलीस स्टेशन: येथे तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर विक्रीप्रकरणी दुकानदारांवर ३ खटले भरण्यात आले आहेत.

जप्त वस्तूंचा तपशील:

​२९७ ई-सिगारेट (वेप)

​८९५ तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर पाकिटे

​एकूण किंमत: ८लाख ३२,९६०/- रुपये.

​या प्रकरणी पोलिसांनी खालील तीन आरोपींना ताब्यात घेऊन संबंधित पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले आहे:

१) हुसेन अब्दुल रहेमान (वय २५, रा. कोरेगाव पार्क, पुणे)

२) हसन शेख (वय ४२, रा. एम.जी. रोड, कॅम्प, पुणे)

३) अब्दुल इस्माईल जाबीर (वय २८, रा. मोलोदिना रोड, कॅम्प, पुणे)

​शहरातील तरुणांच्या आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या प्रतिबंधीत वस्तूंच्या विक्रीविरुद्ध ही मोहीम यापुढेही तीव्रपणे राबवण्यात येईल, असे संकेत गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आले आहेत.

सदर कामगिरी, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर, श्री. पकंज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा २ पुणे शहर, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, अनिल सुरवसे, पोलीस उप निरीक्षक अस्मिता लाड, व पोलीस अंमलदार, राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडीक, गणेश गोसावी, अमोल जगताप, संदिप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, महेश बोराडे, शुभांगी म्हाळसेकर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!