Homeक्राईमपुण्यात पोलिसांची मोठी कारवाई; बुधवार पेठेतून १० बांगलादेशी घुसखोरांना अटक

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई; बुधवार पेठेतून १० बांगलादेशी घुसखोरांना अटक

लोक वार्ता – राज राठोड

​पुणे: शहरात अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध पुणे पोलिसांनी कडक मोहीम उघडली असून, फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठ परिसरातून १० बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये ९ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर ही धडक कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, परिमंडळ १ चे पोलीस उप-आयुक्त श्री. कृषिकेश रावले यांनी फरासखाना पोलीस स्टेशनला पथके तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

​या मोहिमेदरम्यान, पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बुधवार पेठेतील ‘डिस्को बिल्डिंग’ येथे काही बांगलादेशी नागरिक राहत आहेत. माहितीची खात्री पटल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचासह या ठिकाणी छापा टाकला.

​ताब्यात घेतलेल्यांची नावे

या कारवाईत पोलिसांनी खालील संशयितांना ताब्यात घेतले असून ते सर्व मूळचे बांगलादेशचे रहिवासी आहेत:

1)​ सपना बेगम

2)​ मुन्नी अख्तर

3)​ छैती अख्तर सुमैया

4)​ सिमा अख्तर

5)​ बिथी खातून

6) ​साथे बेगम

7) ​शिमला खातून

8) ​यास्मिन अख्तर

9) ​शमीमा अख्तर

10) ​सलीम शेख (पुरुष)

​पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत असे समोर आले की, हे सर्व नागरिक छुप्या मार्गाने भारतात दाखल झाले होते. ताब्यात घेतलेल्या महिला बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करत होत्या, तर पुरुष मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता.

तपासादरम्यान त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिक असल्याचे पुरावे मिळून आले आहेत.

विनापरवाना आणि अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याप्रकरणी या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, श्री. राजेश बनसोडे पोलीस उप-आयुक्त, परि-१ पुणे, श्री. कृषिकेश रावले, पोलीस उप-आयुक्त, परि-२ पुणे, श्री. मिलींद मोहिते, सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग, श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. उत्तम नामवाडे यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पो.उप.नि. अरविंद शिंदे, पो.उप.नि. पुजा जाधव, पोलीस अमंलदार नितीन तेलंगे, महेश पवार, तानाजी नांगरे, मनिषा पुकाळे, राजश्री मोहिते, वैभव येसादे, महेश राठोड, चेतन होळकर, लोंढे, कदम, महिला पोलीस अंमलदार चोरघडे, चौगुले, फुपाणे, काळ यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!