लोक वार्ता – राज राठोड
पुणे: शहरात अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध पुणे पोलिसांनी कडक मोहीम उघडली असून, फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठ परिसरातून १० बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये ९ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर ही धडक कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, परिमंडळ १ चे पोलीस उप-आयुक्त श्री. कृषिकेश रावले यांनी फरासखाना पोलीस स्टेशनला पथके तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या मोहिमेदरम्यान, पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बुधवार पेठेतील ‘डिस्को बिल्डिंग’ येथे काही बांगलादेशी नागरिक राहत आहेत. माहितीची खात्री पटल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचासह या ठिकाणी छापा टाकला.
ताब्यात घेतलेल्यांची नावे
या कारवाईत पोलिसांनी खालील संशयितांना ताब्यात घेतले असून ते सर्व मूळचे बांगलादेशचे रहिवासी आहेत:
1) सपना बेगम
2) मुन्नी अख्तर
3) छैती अख्तर सुमैया
4) सिमा अख्तर
5) बिथी खातून
6) साथे बेगम
7) शिमला खातून
8) यास्मिन अख्तर
9) शमीमा अख्तर
10) सलीम शेख (पुरुष)
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत असे समोर आले की, हे सर्व नागरिक छुप्या मार्गाने भारतात दाखल झाले होते. ताब्यात घेतलेल्या महिला बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करत होत्या, तर पुरुष मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता.
तपासादरम्यान त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिक असल्याचे पुरावे मिळून आले आहेत.
विनापरवाना आणि अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याप्रकरणी या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, श्री. राजेश बनसोडे पोलीस उप-आयुक्त, परि-१ पुणे, श्री. कृषिकेश रावले, पोलीस उप-आयुक्त, परि-२ पुणे, श्री. मिलींद मोहिते, सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग, श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. उत्तम नामवाडे यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पो.उप.नि. अरविंद शिंदे, पो.उप.नि. पुजा जाधव, पोलीस अमंलदार नितीन तेलंगे, महेश पवार, तानाजी नांगरे, मनिषा पुकाळे, राजश्री मोहिते, वैभव येसादे, महेश राठोड, चेतन होळकर, लोंढे, कदम, महिला पोलीस अंमलदार चोरघडे, चौगुले, फुपाणे, काळ यांनी केली.




















