लोक वार्ता – राज राठोड
पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी पुणे गुन्हे शाखा अंतर्गत कार्यरत अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने गांजा विक्री व पुरवठा करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत तब्बल ४३ किलो ७६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण २१लाख ९१हजार ४००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की :
दि.१४/०२/२०२६ रोजी कृपासिंधु ईस्ट सोसायटीचे समोर, गट नंबर ३८० कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, पुणे या ठिकाणी आरोपी नामे. १) अक्षय पोपटराव पाडुळे, वय. ३१ वर्षे, रा. हडपसर, पुणे २) विशाल दत्तात्रय जाधव, वय. २८ वर्षे, रा. हडपसर, पुणे असे महाराष्ट्र राज्यामध्ये गांजा या अंमली पदार्थाची वाहतुक करणे, जवळ बाळगणे व विक्रीसाठी कब्जात ठेवणे बंदी असताना देखील स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता ३४ किलो ४४० ग्रॅम वजनाचा किं ६,८८,८००/- रु. चा गांजा हा अंमली पदार्थ आपले कब्जात विक्री करीता बाळगताना मिळुन आल्याने त्यांच्याविरुध्द लोणीकाळभोर पोलीस ठाणे, पुणे येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. वरिष्ठांच्या आदेशाने अंमली पदार्थ विरोधी पथक -१, गुन्हे शाखा, पुणे यांचेकडे वर्ग करून गांजा हा अंमली पदार्थ पुरवठा करणा-या आरोपीतांचा शोध घेणेबाबत आदेशित करण्यात आले.
सदर वर नमुद गुन्ह्यातील अटक आरोपींतांकड़े कौशल्यापुर्ण तपास करून दिनांक १८/०२/२०२६ रोजी अं.प.वि.प.-१, गुन्हे शाखा, पुणे येथील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व पथक असे जि.धुळे व नंदुरबार येथे रवाना झाले. यातील पाहीजे आरोपींची त्रोटक माहिती असताना वेगवेगळी पथके तयार करून प्रथम आरोपी नामे मंगेश जाण्या पावरा, वय २९ वर्ष रा.मु.पो.भोगावडे खुर्द, ता. धडगाव, जि. नंदुरबार यास अतिशय डोंगराळ भागातून ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक तपास करता त्यास गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी पुरवठा करणारा इसम नामे ज्ञानेश्वर मगन पावरा वय २५ वर्ष, रा.मु.पो. सांगवी, ता. शिरपुर, जि. धुळे याची माहीती प्राप्त झाल्याने तात्काळ स्थानिक पोलीसांच्या मदतीने त्यास मुंबई आग्रा हायवे लगत, मु.पो. नवी सांगवी, ता.शिरपुर, जि. धुळे येथून किं.रू. १,८७,६००/-चा ९.४२० किलो ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व किं.रू.५ लाख – ची होंडा कार सह ताब्यात घेण्यात आले.
सदर गुन्ह्यात अद्यापर्यंत एकुण ४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचेकडून एकुण,२१लाख ९१हजार,४००/- रू त्यामध्ये ४३ किलो ७६ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ एक होण्डाई कंपनीची ऑरा कार व एक होण्डा कंपनीची कार तसेच ५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजन शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, श्री निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे ३ श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण, सहा. पो.निरी. अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, रिहान पठाण, अमोल सरडे, निलेश जाधव, विजय कांबळे, मंगेश गुंड, कदम, अक्षय शिर्के व शेलार यांचे पथकाने केली.




















