Homeक्राईमविमाननगरात स्पा वर पोलिसांची धाड; खिडकीतून उडी मारलेल्या महिलेचा मृत्यू – कारवाईवर...

विमाननगरात स्पा वर पोलिसांची धाड; खिडकीतून उडी मारलेल्या महिलेचा मृत्यू – कारवाईवर प्रश्नचिन्ह

लोक वार्ता – राज राठोड
पुणे: विमाननगर पोलीस स्टेशन हद्दीत ‘रुटस् स्पा’वर टाकण्यात आलेल्या धाडीत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे पोलिसांच्या कारवाईच्या पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अचानक टाकलेल्या छाप्यादरम्यान निर्माण झालेल्या गोंधळात एका महिलेने आणि स्पाच्या मॅनेजरने इमारतीच्या खिडकीतून उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मॅनेजर हा गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार:
रुटस् स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती विमाननगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापेमारी केली. मात्र, पोलिसांनी अचानक धाड टाकताच स्पामध्ये एकच गोंधळ उडाला.
या गोंधळात एका महिलेने आणि स्पाचा मॅनेजर शेख याने इमारतीच्या खिडकीतून खाली उडी मारली.

उडी मारताना महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, मॅनेजर शेख हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कारवाईवर निर्माण झालेले प्रश्न:
या घटनेनंतर पोलिसांच्या छापेमारीच्या पद्धतीबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.
छापा टाकताना आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का?
इमारतीतून कोणी उडी मारू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था होती का?
अचानक धाड टाकण्यामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला जबाबदार कोण?.एका महिलेचा जीव या कारवाई मध्ये गेल्याने, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे

घटनेनंतर पोलिसांकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नसून, वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मृत महिलेची ओळख आणि नेमकी परिस्थिती याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

विमाननगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे पोलिस कारवाईच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!