लोक वार्ता –राज राठोड
पुणे: शहरात बेकायदेशीरपणे विक्री केल्या जाणाऱ्या प्रतिबंधीत ई-सिगारेट (वेप) आणि तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरविरुद्ध पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडाकेबाज कारवाई केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली, शहरात एकूण ६ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी ८ लाख ३२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ३ जणांना ताब्यात घेतले आहे.
पुणे शहरात काही दुकानदार लपून-छपून प्रतिबंधीत ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने लष्कर, कोरेगाव पार्क आणि कोथरुड या परिसरात ही धडक मोहीम राबवली.

गुन्हे आणि जप्त मुद्देमाल:
या कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे आणि खटले दाखल केले आहेत:
लष्कर आणि कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन: येथे ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९’ च्या कलम ७ व ८ नुसार ०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोथरुड आणि लष्कर पोलीस स्टेशन: येथे तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर विक्रीप्रकरणी दुकानदारांवर ३ खटले भरण्यात आले आहेत.
जप्त वस्तूंचा तपशील:
२९७ ई-सिगारेट (वेप)
८९५ तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर पाकिटे
एकूण किंमत: ८लाख ३२,९६०/- रुपये.
या प्रकरणी पोलिसांनी खालील तीन आरोपींना ताब्यात घेऊन संबंधित पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले आहे:
१) हुसेन अब्दुल रहेमान (वय २५, रा. कोरेगाव पार्क, पुणे)
२) हसन शेख (वय ४२, रा. एम.जी. रोड, कॅम्प, पुणे)
३) अब्दुल इस्माईल जाबीर (वय २८, रा. मोलोदिना रोड, कॅम्प, पुणे)
शहरातील तरुणांच्या आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या प्रतिबंधीत वस्तूंच्या विक्रीविरुद्ध ही मोहीम यापुढेही तीव्रपणे राबवण्यात येईल, असे संकेत गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आले आहेत.
सदर कामगिरी, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर, श्री. पकंज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा २ पुणे शहर, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, अनिल सुरवसे, पोलीस उप निरीक्षक अस्मिता लाड, व पोलीस अंमलदार, राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडीक, गणेश गोसावी, अमोल जगताप, संदिप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, महेश बोराडे, शुभांगी म्हाळसेकर यांनी केली.




















