Homeक्राईमयात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा...

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत छडा, आरोपी अटकेत

लोक वार्ता – राज राठोड 

पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत मोठ्या रकमेच्या चोरीचा अवघ्या दोन तासांत छडा लावला आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक २२१३९ पुणे–अजनी हमसफर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची पर्स पुणे रेल्वे स्थानकावरून गाडीत चढल्यानंतर चोरीला गेली. ही घटना कोच ए/२ मधील आसन क्रमांक ३६ येथे घडली. चोरी झालेल्या पर्समध्ये १२६.५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १२ हजार ३०० रोख रक्कम होती. एकूण मालमत्तेची किंमत सुमारे १० लाख ३२ हजार ८०० इतकी होती. या घटनेची तक्रार जीआरपी पुणे येथे दाखल करण्यात आली असून बीएनएसच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

तक्रार मिळताच आरपीएफ पुणेच्या तेजस्विनी सीपीडीएस पथकाने तात्काळ तपास सुरू केला. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. यामध्ये एक संशयित व्यक्ती पर्स घेऊन डब्यातून उतरताना दिसून आला. त्यानंतर पथकाने तातडीने शोधमोहीम राबवत संशयिताचा पाठलाग केला.

सततच्या पाठपुराव्यामुळे अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक करण्यात यश आले.

चौकशीदरम्यान आरोपीने आपली ओळख राजकुमार शंकर पवार (वय ३३, रा. भालकी, जिल्हा बिदर, कर्नाटक) अशी सांगितली.

आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून चोरीला गेलेले सर्व सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आले, एकूण १० लाख ३२ हजाराचा मुद्देमाल सुरक्षितपणे हस्तगत करण्यात आला.

पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला जप्त मुद्देमालासह जीआरपी पुणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या कारवाईमुळे आरपीएफ पुणेची तत्परता, सतर्कता आणि तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर पुन्हा एकदा समोर आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

error: Content is protected !!