Homeक्राईमउपमुख्यमंत्री यांच्या नावाचा गैरवापर; ‘ओएसडी’ असल्याचे भासवणारा तोतया पोलिसांच्या जाळ्यात

उपमुख्यमंत्री यांच्या नावाचा गैरवापर; ‘ओएसडी’ असल्याचे भासवणारा तोतया पोलिसांच्या जाळ्यात

लोक वार्ता – राज राठोड

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात ‘ओएसडी’ (विशेष कार्याधिकारी) असल्याचे खोटे भासवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया व्यक्तीचा पर्दाफाश विश्रामबाग पोलिसांनी केला आहे. 

या प्रकरणात प्रद्युम्न श्रीहरी पाटील (वय ४७, रा. हिंजवडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १ एप्रिल रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास परिमंडळ १ पोलीस उपायुक्त कार्यालयात घडली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

असे उघड झाले प्रकरण:

पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी सांगितले की, २०२१ मध्ये समर्थ पोलीस ठाण्यात सॉफ्टवेअर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. हा खटला सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणातील तक्रारदार आगरवाल यांची ओळख त्यांच्या मित्रामार्फत प्रद्युम्न पाटीलशी झाली होती.

पाटीलने स्वत:ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील ओएसडी असल्याचे सांगत, “पोलिसांच्या मदतीने कोर्टाबाहेर नुकसानभरपाई मिळवून देतो,” असे आमिष दाखवले. यासाठी त्याने मिळणाऱ्या रकमेपैकी १० टक्के हिस्सा मागितल्याचेही समोर आले आहे.

थेट पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात हजेरी:

बुधवारी दुपारी पाटील थेट पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात दाखल झाला. उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आल्याचे समजताच पोलिसांमध्ये काही काळ गडबड उडाली. त्याने रावले यांची भेट घेत, संबंधित प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचा आरोप करत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

संशय आल्याने सत्य बाहेर:

पाटीलच्या बोलण्यात विसंगती जाणवल्याने पोलीस उपायुक्त रावले यांना संशय आला. त्यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून खातरजमा केली. त्यावेळी असा कोणताही व्यक्ती ओएसडी म्हणून कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सखोल चौकशी करताच पाटीलची तोतयागिरी उघडकीस आली. त्याला तात्काळ विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पुढील तपास सुरू:

पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले असून, या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे करीत आहेत.

या घटनेमुळे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करण्याचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!