लोक वार्ता – राज राठोड
पुणे (शिवाजीनगर): जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाची बनावट कागदपत्रांद्वारे दिशाभूल करणाऱ्या टोळीचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
नऱ्हे येथील एका कंपनीची खोटी ‘पेमेन्ट स्लिप’ तयार करून न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी विक्रम भिमाजी धोंडगे याला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?
आरोपी गणेश अजिनाथ बोराटे याच्याविरुद्ध न्यायालयाने वॉरंट काढले होते. यातून वाचण्यासाठी त्याने त्याचा साथीदार विक्रम धोंडगे याच्या मदतीने ‘

दुमास इंडस्ट्रीज’ (नवले इंडस्ट्रीयल इस्टेट, नऱ्हे) या कंपनीची एक बनावट पेमेन्ट स्लिप तयार केली. विक्रम धोंडगे हा जामीनदार म्हणून उभा राहिला आणि त्याने ही बनावट स्लिप न्यायालयात सादर करून फसवणूक केली. खडकवासला येथील अरविंद सोमाणी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती.

पोलिसांची कारवाई:
शिवाजीनगर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने २३ जानेवारी २०२६ रोजी आरोपी विक्रम धोंडगे याला बेड्या ठोकल्या. मुख्य सूत्रधार गणेश बोराटे यानेच ही बनावट स्लिप तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलीस सध्या त्याचा कसोशीने शोध घेत आहेत.
सदरची कामगिरी मा. सह पोलीस आयुक्त सो, श्री. रंजन कुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त सो, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ-१, श्री. कृषीकेश रावले, तत्कालीन मा. सहा पोलीस आयुक्त सो, श्री. साईनाथ ठोंबरे, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीशकुमार दिघावकर, सहा पोलीस निरीक्षक श्री. संतोष पाटील, पोलीस अंमलदार नलिनी क्षिरसागर, सचिन जाधव, तेजस चोपडे, दिपक चव्हाण यांनी केली आहे.




















