Homeक्राईमअश्लील फोटो-व्हिडिओ, लैंगिक अत्याचार व खंडणी प्रकरण उघडकीस : ब्लॅकमेल करून खोटे...

अश्लील फोटो-व्हिडिओ, लैंगिक अत्याचार व खंडणी प्रकरण उघडकीस : ब्लॅकमेल करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा कट, पती-पत्नी अटकेत

लोक वार्ता – राज राठोड

पुणे : महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करणाऱ्या तसेच खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या पती-पत्नीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

कर्जाच्या व्यवहारातून सुरू झाला छळ

जून २०२४ मध्ये फिर्यादी महिलेने आरोपींकडून २ लाख रुपये दरमहा ५ टक्के व्याजाने घेतले होते. या रकमेपोटी तिने एकूण ३ लाख ६० हजार रुपये परत दिले. तरीही आरोपींकडून अधिक पैशांची मागणी करण्यात येत होती. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर महिलेचा छळ सुरू करण्यात आला.

जबरदस्ती लैंगिक अत्याचार व धमक्या:

दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी आरोपी प्रताप जाधव याने फिर्यादीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी आमिष:

ऑक्टोबर २०२५ मध्ये बारामती एमआयडीसी येथील एका उद्योजकाविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी आरोपींनी फिर्यादीला प्रवृत्त केले.

त्यासाठी २० ते २५ लाख रुपये व बारामती येथील फ्लॅट नावावर करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. नकार दिल्यानंतर महिलेचा जीव घेण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितली.

ब्लॅकमेल करून खंडणी उकळल्याचा आरोप:

आरोपी महिला उच्चभ्रू व प्रतिष्ठित व्यक्तींना जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत फोटो काढत असे. त्यानंतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पती-पत्नी दोघे मिळून मोठ्या रकमेची खंडणी उकळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हा दाखल व अटक:

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ५७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६४(२)(एम), ७७, ३०८(३), ४९, ३५१(२), ३(५) तसेच सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ अंतर्गत गुन्हा नोंद आहे.

आरोपी प्रताप रमेश जाधव (वय ४५) व पल्लवी प्रताप जाधव (वय २८) यांना दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे.

या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. आणखी पीडित व्यक्ती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री.राजेश बनसोडे, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्री. मिलींद मोहीते मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, भारती विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सपोनि स्नेहल थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी, संदीप आगळे, सागर बोरगे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!