Homeक्राईमचैन स्नॅचिंगचा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद; ५ गुन्ह्यांचा पर्दाफाश – आंबेगाव पोलिसांची धडाकेबाज...

चैन स्नॅचिंगचा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद; ५ गुन्ह्यांचा पर्दाफाश – आंबेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई

लोक वार्ता – राज राठोड

पुणे: आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने कौशल्यपूर्ण व अचूक माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत चैन स्नॅचिंग व जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला जेरबंद केले आहे. या आरोपीकडून एकूण ५ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून ३ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटनेची पार्श्वभूमी:

दि. २ मे २०२५ रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी हे जुना सातारा–पुणे रोडवरील गुजरवाडी येथे त्यांची मोपेड रस्त्याच्या कडेला पार्क करून झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईलसह मोपेड लंपास केली. याप्रकरणी आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ९१/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुप्त माहिती आणि सापळा:

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार हनुमंत मासाळ व चेतन गोरे हे करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून चोरी करणारा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश नरहरी शिंदे (रा. जाधवनगर, बडगाव बु., पुणे) असल्याचे निष्पन्न झाले. तो दरी पुलाजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने तसेच पोलीस उपनिरीक्षक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने आंबेगाव परिसरासह पुणे शहरातील विविध भागात व पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीतही चैन स्नॅचिंग केल्याचे उघड केले. तसेच तो खडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणात पाहिजे आरोपी असल्याचेही समोर आले.

उघडकीस आलेले गुन्हे: 

आरोपीकडून खालीलप्रमाणे एकूण ५ गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला:

आंबेगाव पोलीस स्टेशन – २ गुन्हे

सिंहगड रोड पोलीस स्टेशन – १ गुन्हा

बावधन पोलीस स्टेशन (पिंपरी चिंचवड आयुक्तालय) – १ गुन्हा

खडक पोलीस स्टेशन – पाहिजे आरोपी

मुद्देमाल जप्त:

आरोपीकडून पोलिसांनी आंबेगाव व सिंहगड रोड येथील चैन स्नॅचिंग प्रकरणातील सोन्याचे दागिने, तसेच गुन्हे करताना वापरलेली मोपेड गाडी, असा एकूण ३ लाख ९२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि तपास पथकातील पोलिसांच्या तत्परतेमुळे ही कारवाई शक्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदरची कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. मिलींद मोहिते, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर, मा. राहुल आवारे, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे श्री. शरद झिने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गजानन चोरमले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरिश गायकवाड, सुभाष मोरे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, प्रमोद भोसले, राकेश टेकवडे यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!