लोक वार्ता – राज राठोड
पुणे : स्वारगेट स्टॅण्ड परिसरामध्ये मोबाईल हिसकावून पसार होणाऱ्या दोन चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी तत्पर कारवाई करत पहाटेच्या सुमारास जेरबंद केले आहे.या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेले मोबाईल फोन हस्तगत करत स्वारगेट पोलीस ठाण्यातील एकूण दोन गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे २ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्वारगेट पोलिसांकडून दाखल असलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध सुरू असताना, सपोनि अभिजीत पाटील व तपास पथक कार्यरत होते. या पथकात पोलीस अंमलदार सुजय पवार, फिरोज शेख व हनुमंत दुधे यांचा समावेश होता.
दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दाखल गुन्ह्यातील आरोपी हे ग्रे रंगाच्या बर्गमॅन मोपेड (एम.एच.-१२-यू/एल-५२०३) वरून स्वारगेट कॅनॉल परिसरात येणार आहेत. ही माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशानुसार कायदेशीर कारवाईसाठी नियोजन करण्यात आले.

त्यानुसार पहाटे सुमारे ०५.१० वाजता सापळा रचून संशयित मोपेडला थांबविण्यात आले. तपासादरम्यान आरोपींनी त्यांची नावे १) आयान रिजवान शेख (वय २१, रा. अंगारशाह तकीया बस्ती, भवानी पेठ, पुणे) व २) रमजान रज्जाक शेख (वय २६, रा. कासेवाडी, भगवा चौक, पुणे) अशी सांगितली.
पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यात दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेला सॅमसंग मोबाईल तसेच इतर चार वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन आढळून आले. तपासात हे सर्व मोबाईल स्वारगेट पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील सर्व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे स्वारगेट पोलीस ठाण्यातील एकूण दोन मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून २,५७,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास स्वारगेट पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा साो. सह-आयुक्त साो, पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे साो. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. मिलींद मोहीते, पोलीस उप-आयुक्त साो. परि-२, पुणे शहर, मा. श्री. धन्यकुमार गोडसे साो. सहाय्यक पोलीस आयुक्त साो. स्वारगेट विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. यशवंत निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. विकास भारमळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. अभिजीत पाटील, सपोनि. तपास पथक, लक्ष्मण जाधव, पोलीस उप-निरीक्षक, पो. अं. सुजय पवार, हनुमंत दुधे, फिरोज शेख, रमेश चव्हाण, अमोल जाधव, हर्पल शिंदे, दिपक खंदाड, प्रशांत टोणपे, सागर काळे, संदिप घुले यांनी एकत्र मिळुन केली आहे.




















