Homeक्राईमखुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तीन महिन्यांपासून फरार असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तीन महिन्यांपासून फरार असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

लोक वार्ता – राज राठोड

​पुणे: मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात सहकारनगर पोलिसांच्या तपास पथकाला यश आले आहे. विशाल बाळासाहेब कांबळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, मारामारी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

​२५ ऑक्टोबर २०२५ रोजी धनकवडी येथील शंकर महाराज वसाहतीत जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादीवर जीवघेणा हल्ला झाला होता. विकी कांबळे आणि त्याचा भाऊ विशाल कांबळे यांनी ठाकर गिरणीसमोर फिर्यादीला कोयत्याने बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ३५१(२)(३) सह आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा (क्र. ४६०/२०२५) दाखल करण्यात आला होता.

​गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी विशाल कांबळे हा फरार होता. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सहकारनगर तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल पवार आणि अभिमान बागलाने यांना बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, विशाल कांबळे हा लोहगाव परिसरात लपून बसला आहे.

​माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने लोहगाव येथे सापळा रचून छापा टाकला आणि विशालला ताब्यात घेतले. पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपायुक्त, श्री ऋषीकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग धन्यकुमार घोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मनोजकुमार लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील सपोनि रुपेश जाधव, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, अभिमान बागलाने, महेश भगत, किरण कांबळे, सागर सुतकर, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे, बजरंग पवार, अमित पदमाळे, मारोती नलवाड, रफीक तडवी, योगेश ढोले यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!