Homeक्राईमलक्ष्मीनारायण चौकात अवैध हुक्का पार्लरचा पर्दाफाश: शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश, हॉटेल...

लक्ष्मीनारायण चौकात अवैध हुक्का पार्लरचा पर्दाफाश: शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश, हॉटेल मालकासह सात जणांवर गुन्हा दाखल

लोक वार्ता – राज राठोड

​पुणे: स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चौक येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर स्वारगेट पोलिसांनी शुक्रवारी (३० जानेवारी २०२६) रात्री मोठी कारवाई केली. हॉटेलचे शटर आतून बंद असल्याने पोलिसांनी चक्क अग्निशमन दलाच्या मदतीने कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि हुक्का ओढणाऱ्या ग्राहकांसह हॉटेल व्यवस्थापनावर कारवाई

​स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मोदी प्लाझा बिल्डिंगमधील ‘एलडिनेरो हॉटेल’ (El Dinero Hotel) मध्ये बेकायदेशीररित्या हुक्का पार्लर चालवले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गुन्हे विकास भारमळ आणि त्यांच्या पथकाने रात्री या ठिकाणी छापा टाकला.

​पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा हॉटेलचे शटर आतून बंद होते. पोलिसांनी वारंवार आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संशय बळावला. अखेर पोलिसांनी जनता अग्निशमन केंद्राच्या जवानांना पाचारण केले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी संयुक्तपणे शटरचे कुलूप तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला.

​साहित्य जप्त आणि गुन्हा दाखल:

हॉटेलमध्ये प्रवेश करताच, तिथे कामगारांमार्फत ग्राहकांना मानवी आरोग्यास धोकादायक असलेले तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर्स आर्थिक फायद्यासाठी पुरवले जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून:

​विविध हुक्का पॉट आणि चिलीम

​प्रतिबंधित तंबाखूजन्य फ्लेवर्स

​इतर साहित्य आणि रोख रक्कम

असा एकूण २२हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​या प्रकरणी हॉटेल मालक प्रतिक विकास मेहता (रा. चव्हाणनगर, धनकवडी), व्यवस्थापक सनी सुंदर परिहार (वय ३३, रा. गुलटेकडी) यांच्यासह वेटर दिपक जैन, मोसिन शेख, अनमोल श्रेष्ठ, पर्वत परिहार आणि ढोल बहादुर परिहार अशा एकूण सात जणांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री राजेंद्र बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त साो, परि. २ पुणे शहर श्री मिलींद मोहिते, मा. सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर श्री धन्यकुमार गोडसे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पो.स्टे. चे मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री विकास भारमळ, महिला पोलीस उप निरीक्षक सुजाता जाधव, व पोलीस अंमलदार टोणपे, कुडाळकर, ठोंबरे, जाधव, साळवे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!