Homeक्राईमकाळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी; ९ लाख २२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त,...

काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी; ९ लाख २२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

लोक वार्ता –राज राठोड
​पुणे: एका हाय-प्रोफाइल घरफोडीच्या गुन्ह्यात काळेपडळ तपास पथकाने केवळ फॉरेन्सिक पुरावे, रक्ताचे नमुने आणि तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर करत, आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

पोलिसांनी आरोपीकडून ९ लाख २२ हजार रुपये किमतीचा चोरीस गेलेला ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

​काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकातील अधिकारी यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले, पो. अं. लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, नितीन ढोले, आणि महादेव शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आंबिका हॉटेल रोड, पिसोळी येथील घरफोडी झालेल्या फ्लॅटमध्ये फरशीवर आणि गॅलरीत रक्ताचे डाग पोलिसांना दिसले.
​पो. अं. विशाल ठोंबरे यांनी त्वरित पाऊल उचलत फॉरेन्सिक टीमला बोलावून रक्ताचे नमुने तपासणीसाठी जमा केले.

​७२ सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण:
​पोलिसांनी परिसरातील बंका सफायर सोसायटीसह संपूर्ण उंड्री, कात्रज-कोंढवा रोड परिसरातील तब्बल ७२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी केली. फुटेज तपासत असताना एका दृश्यात आरोपी त्याच्या मोबाईलवर बोलताना आढळला.

​तांत्रिक विश्लेषक पो.हवा. प्रतिक लाहीगुडे यांनी या मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले.
​तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी हा कोंढवा परिसरात असल्याची माहिती मिळाली.
​पोलिसांनी तात्काळ कोंढवा परिसरातून मुस्तफा शकील अन्सारी (वय ४१, रा. कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण ९ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. काळेपडळ पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५. पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पो. नि. गुन्हे यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो. हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

error: Content is protected !!