Homeक्राईमगावठी पिस्टलसह दोन अल्पवयीन ताब्यात –८ वाहन चोरीचे गुन्हे उघड

गावठी पिस्टलसह दोन अल्पवयीन ताब्यात –८ वाहन चोरीचे गुन्हे उघड

लोक वार्ता –राज राठोड 

पुणे | ६ ऑक्टोबर २०२५ – हडपसर पोलिसांनी कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सतर्क पेट्रोलिंगदरम्यान वाहन चोरीकरणाऱ्या दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून १ गावठी पिस्टल आणि १ जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले आहे.

हडपसर पोलीस ठाण्याचे तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड आणि पथकातील अंमलदार अमित साखरे व महावीर लोंढे हे कोजागिरी पौर्णिमानिमित्त हद्दीतील गर्दीच्या ठिकाणी गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे मांजरी परिसरात संशयितांवर छापा टाकण्यात आला आणि दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष त्यांच्या अंगझडतीतून देशी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस सापडले.

गुन्ह्यांची कबुली:

सखोल चौकशीत दोन्ही अल्पवयीनांनी गेल्या वर्षभरात ‘मौजमजेसाठी’ हडपसर परिसरातून अनेक दुचाकी व रिक्षा चोरल्याचे कबूल केले. चोरीनंतर त्यांनी वाहने विविध ठिकाणी सोडून दिली असल्याचेही स्पष्ट केले. तपासात आतापर्यंत ८ वाहनचोरी प्रकरणांची उकल झाली असून, यासंबंधी आधीपासूनच गुन्हे नोंद आहेत, हडपसर पोलीस पुढील तपास करत आहे .

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अश्विनी जगताप यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महावीर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले व माधव हिरवे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

error: Content is protected !!