Homeक्राईमचोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना आसाम येथून अटक, बाणेर पोलिसांची कारवाई

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना आसाम येथून अटक, बाणेर पोलिसांची कारवाई

लोक वार्ता – राज राठोड 

पुणे: बाणेर येथील एका घरात चोरी प्रकरणी गुन्ह्यात दाखल असलेल्या चोरट्याला पुणे पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तब्बल गुवाहाटी (आसाम) येथून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरलेल्या मालापैकी एक लॅपटॉप, एक मोबाईल आणि पाच एटीएम कार्ड असा एकूण ₹३५,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर पोलीस स्टेशन येथे चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून प्रवेश करत घरातून पाच मोबाईल, एक लॅपटॉप, पाच एटीएम कार्ड आणि ३हजार रोख रक्कम, असा एकूण ७३,००० किंमतीचा ऐवज चोरून नेला होता.

कलकत्ता ते गुवाहाटी असा तपास

गुन्ह्याच्या तपासादरम्यान आणि गोपनीय बातमीच्या आधारे, हा आरोपी कलकत्ता येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कलकत्ता येथे धाव घेतली.

कलकत्ता येथे पोहोचल्यावर आरोपीने ठिकाण बदलून तो गुवाहाटी (आसाम) येथे गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे तपास पथकाने तात्काळ कलकत्ताहून गुवाहाटीकडे कूच केले. गुवाहाटी येथे शोध घेऊन मुख्य आरोपी मोहम्मद इमरान इरफान शेख (वय २४, रा. कलकत्ता, पश्चिम बंगाल) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपी मोहम्मद शेख याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने चोरी केलेला लॅपटॉप कलकत्ता येथील चांदणी मार्केटमधील एका दुकानात विकल्याची कबुली दिली. त्यानंतर तपास पथक आरोपीसह पुन्हा कलकत्ता येथे परतले.

पोलिसांनी लॅपटॉप विकत घेणारा व्यक्ती शेख अफताब अली (वय ३०, रा. कलकत्ता) याचा शोध घेऊन त्यालाही या गुन्ह्यात अटक केली आहे. या दोघांनाही कलकत्ता न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

या तपास मोहिमेदरम्यान, पोलिसांनी मुख्य आरोपीकडून एक लॅपटॉप, एक मोबाईल आणि पाच एटीएम कार्ड असा एकूण ३५,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. बाणेर पोलिसांच्या या जलद आणि लांब पल्ल्याच्या कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला तत्काळ जेरबंद करणे शक्य झाले आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परि.४, पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर, श्री. विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती अलका सरग, यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक के. बी डाबेराव, व पोलीस अंमलदार बाबा आहेर, किसन शिंगे, गणेश गायकवाड, अतुल इंगळे, गजानन अवातिरक, प्रदिप खरात, प्रितम निकाळजे, शरद राऊत व रोहीत पाथरुट यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

error: Content is protected !!