Homeक्राईम२४ तासांत चोरट्याला अटक: ऑटो रिक्षांचे टायर व स्टेफनी चोरी करणारा आरोपी...

२४ तासांत चोरट्याला अटक: ऑटो रिक्षांचे टायर व स्टेफनी चोरी करणारा आरोपी जेरबंद

लोक वार्ता –राज राठोड
पुण्यातील काळेपडळ परिसरात ऑटो रिक्षां, टायर व स्टेफनी चोरी करणाऱ्या एका चोरट्याला केवळ २४ तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कारवाई केली.

चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी तपास पथकाला सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, अतुल पंधरकर, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे व नितीन ढोले हे पेट्रोलिंग करत असताना एक महत्त्वाची माहिती मिळाली.

पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लक्ष्मीपार्क येथील पालखी मार्गावर, गौरी हॉटेलजवळ एक इसम रिक्षासह थांबलेला असून त्याच्याकडे चोरीचे टायर आहेत.

सदर ठिकाणी पोलीस तात्काळ पोहोचले व संशयित इसमास ताब्यात घेतले. त्याचे नाव शादाब युसुफ अन्सारी (वय २०, रा. गल्ली नं. २४, सय्यदनगर, हडपसर, पुणे) असे असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीमध्ये त्याच्याकडून २ रिक्षा, टायर व स्टेफनी मिळून एकूण २लाख ५६हजार किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री.धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन श्री.मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमर काळंगे यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर व महादेव शिंदे या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

error: Content is protected !!