Homeक्राईमपुण्यात गुटखा व गांजाचा मोठा साठा जप्त; तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये १७ लाखांचा...

पुण्यात गुटखा व गांजाचा मोठा साठा जप्त; तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये १७ लाखांचा ऐवज हस्तगत

पुणे | लोक वार्ता – राज राठोड :

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, पुणे शहरातील चंदननगर व येरवडा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथक २ ने केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण १७लाख ८हजार ५५५ रुपये किमतीचा गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ व गांजा जप्त करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वडगाव शेरीत तिघांकडून ६लाख ४५हजार,३१५ प्रतिबंधित गुटखा जप्त

दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीन कुमार नाईक व त्यांच्या पथकाने चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान वडगाव शेरी परिसरात तिघा संशयितांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून ₹६,४५,३१५/- किमतीचा प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ व पान मसाला जप्त करण्यात आला.

आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:

– श्रवण हनुमाराम गेहलोत (३५ वर्षे)

– लाबुराम पकाराम देवासी (२५ वर्षे)

– दिनेशकुमार आचलाराम प्रजापती

या तिघांविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने अधिनियम २००३ व अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच

सैनिकवाडीमध्ये २.१ किलो गांजासह युवक अटकेत

चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आनंद हाईट्स, सैनिकवाडी, वडगाव शेरी परिसरात सार्वजनिक रस्त्यावर विकी विजय काशीद (२२ वर्षे) या युवकाकडून ५२ हजार किमतीचा २ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा पान शॉपवर छापा; १०लाख ११हजाराचा गुटखा व पान मसाला जप्त,

येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुंजन चौक, मदर टेरेसा मंदिराजवळील भोला पान शॉपवर छापा टाकून मालक सुभाषचंद्र रामअवध मोर्या (३४ वर्षे) याच्याकडून १०लाख ११हजार २४० किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त करण्यात आला.

त्याच्याविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने अधिनियम व अन्न सुरक्षा मानके अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून पुढील तपास सुरू असून अंमली पदार्थ व प्रतिबंधित वस्तूंविरोधात कठोर कारवाई केली जात आहे.

पुणे पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थ व प्रतिबंधित तंबाखुजन्य वस्तूंविरोधातील कठोर भूमिकेचे प्रतीक ठरली आहे.

नमुद कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २. श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर, पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, महिला पोलीस उप-निरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार अजिम शेख, साहिल शेख, आझाद पाटील, मयुर सुर्यवंशी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, बबनराव केदार, नितीन जगदाळे, युवराज काबळे, शेखर खराडे, दिनेश बास्टेवाड, मच्छिंद्र धापसे, उदय राक्षे, संदिप शेळके, परेश सावंत, प्रफुल्ल मोरे, महिला पोलीस अंमलदार दिशा खेवलकर व साधना पवार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

error: Content is protected !!