Homeक्राईमनिंबाळकरवाडी खून प्रकरण: कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटवून, भारती विद्यापीठ पोलिसांकडून १२ तासांत...

निंबाळकरवाडी खून प्रकरण: कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटवून, भारती विद्यापीठ पोलिसांकडून १२ तासांत खुनाचा यशस्वी उलगडा

लोक वार्ता –राज राठोड
पुणे: गुजर-निंबाळकरवाडी (कात्रज, पुणे) येथे कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवून भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या १२ तासांत खुनाचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे. मयत व्यक्तीच्या मित्रानेच किरकोळ कारणावरून त्याचा खून केल्याचे उघड झाले आहे.

दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता, गुजर-निंबाळकरवाडी (कात्रज, पुणे) येथील गवतात एका अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या आणि त्यावर अळ्या पडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे आणि पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केल्यानंतर, अज्ञात इसमाने या व्यक्तीचा खून केल्याची खात्री पोलिसांना झाली. त्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन मयताची ओळख पटवण्यासह आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

१२ तासांत आरोपी जेरबंद

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी आणि तपास पथकाने युद्धपातळीवर तपासाला सुरुवात केली.
मृतदेहाची ओळख: तपास पथकाने घटनास्थळाजवळील रहिवाशांकडे चौकशी केली असता, मयत व्यक्तीचे नाव सद्दाम ऊर्फ सलमान शेख (अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे, रा. गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज) असे निष्पन्न झाले.
गुन्हा दाखल: त्यानंतर, पोलीस अंमलदार विठ्ठल एकनाथ चिपाडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
खुनाचा उलगडा: तपासादरम्यान पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी आणि पोलीस अंमलदार सागर बोरगे यांनी मयत सद्दाम ऊर्फ सलमान शेख याचा मोबाईल नंबर मिळवला. या मोबाईल नंबरच्या तांत्रिक विश्लेषणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.

तांत्रिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, मयत सद्दाम ऊर्फ सलमान शेख याचा मित्र विक्रम चैठा रोतिया (वय ३२ वर्षे, धंदा मजुरी, रा. सणसनगर, माळवाडी, निंबाळकरवाडी, कात्रज, मूळ रा. झारखंड) यानेच त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने आरोपी विक्रम रोतिया याचा शोध घेऊन त्यास गुजरवाडी भागात अटक केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडे हे करत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी सांगितले की मयत सद्दाम शेख व आरोपी विक्रम चैठा रोतिया ,दोघे एकाच रूममध्ये राहत होते ,गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज. या ठिकाणी राहत होते, मयत इसम व आरोपी यांच्यात सतत भांडणे होत होती, हे दोघे मजुरीचे काम करत होते , मयत सद्दाम शेख हा कामाचे पैसे ,विक्रम चैठा रोतिया याला देत नव्हता, व वारंवार विक्रम याला मारहाण करायचा, व धमकी देत होता. याचाच राग मनात धरून, विक्रम याने सद्दाम शेख याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून त्याला घराच्या पलीकडे असलेल्या दरीमध्ये ढकलून दिले, अशी माहिती आरोपी विक्रम याच्याकडून मिळाली आहे, आरोपीला अटक करण्यात आली आहे, पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, सागर कोंडे, सचिन सरपाले, विठठल चिपाडे, सौरभ वायदंडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

error: Content is protected !!