लोक वार्ता –राज राठोड
पुणे: भारती विद्यापीठ पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका तस्कराला अटक करून त्याच्याकडून ६४ हजार रुपये किमतीचा ३ किलो १९२ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यास तसेच परिसरात पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्याच अनुषंगाने दिनांक ११/१०/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते.
पेट्रोलिंगदरम्यान, ऐश्वर्या बँक्वेट हॉलचे मागील बाजूस असलेल्या निर्माण विवा सोसायटीकडे जाणाऱ्या रोडवर, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे एक संशयित इसम आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता, त्याच्या ताब्यातील पोत्यामध्ये विक्रीसाठी आणलेला ३ किलो १९२ ग्रॅम वजनाचा, ६४ हजार रुपये किमतीचा गांजा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या जवळ बाळगलेला आढळून आला.
पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने त्याचे नाव शिवम तेजराव धोरण (वय २४ वर्षे, रा.आंबेगाव बुद्रुक, पुणे) असे सांगितले.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिवम धोरण याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर, श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, महेश बारवकर, मंगेश पवार, अभिनय चौधरी, सागर बोरगे व निलेश खैरमोडे यांनी केली केली आहे.




















