Homeक्राईममोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला: पर्वती पोलिसांनी सापळा रचून पकडले

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला: पर्वती पोलिसांनी सापळा रचून पकडले

लोक वार्ता –राज राठोड

मिळालेल्या माहितीनुसार:
पुणे शहरातील पर्वती पोलीस स्टेशनच्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४६/२०२४ अंतर्गत दाखल मोक्का व विविध गंभीर कलमांतील गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेल्या अजय भागवत घाडगे (वय २४, रा. कचरावत चाळ, शनिनगर चौक, दत्तनगर, कात्रज) याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस अंमलदार महेश मंडलिक व सद्दाम शेख यांना माहिती मिळाली की, अजय घाडगे आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी दत्तनगर कात्रज येथे येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळताच,वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पवार व तपास पथकाने तत्काळ सापळा रचून १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आरोपीला शिताफीने अटक केले.

सदर गुन्ह्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १०९(१), ११८(१), १८९(१)(४), १९०, १९१(२), आर्म्स अ‍ॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट, महाराष्ट्र पोलीस कायदा व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अंतर्गत गंभीर आरोप आहेत. अटक केल्यानंतर आरोपीस सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर यांच्यासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे,

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-०३ पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे सुचनाप्रमाणे पर्वती पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सद्दाम शेख, नानासो खाडे, सुर्या जाधव, श्रीकांत शिंदे, अमोल दबडे, स्वप्निल घुगे, मनोज बनसोड, अमित चिव्हे व किर्ती भोसले यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

error: Content is protected !!