लोक वार्ता –राज राठोड
पुणे | भारती विद्यापीठ पोलिसांनी गंभीर गुन्ह्याचा थरार उलगडत, चुलत भावाचा गळा चिरून खून करून मृतदेह डोंगरात टाकून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला अवघ्या ३६ तासांत अटक केली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयातून हा खून झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
मिसिंग तक्रारीपासून खुनाचा उलगडा:
दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रारदार विजय महादेव कुमार (वय ३७, लेबर ठेकेदार) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यांच्या कामगारांपैकी अजयकुमार गणेश पंडीत (वय २२, मूळ गाव – हजारीबाग, झारखंड) हा १७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता घरातून ‘भाजी आणायला जातो’ असे सांगून बाहेर पडला, परंतु परतला नाही.त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली.
सदर घटनेच्या अनुशंगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना मिसींग व्यक्तीचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या.
प्राथमिक चौकशीत तपास पथकाला काही संशयास्पद माहिती मिळू लागली. तपासादरम्यान कळाले की,
मिसिंग अजयकुमार याचे त्याचा चुलत भाऊ अशोक पंडीत यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते, यावरून त्यांच्यात अनेकदा वादही झाले होते. या माहितीच्या आधारे तपासाची दिशा बदलली.
पोलीस अंमलदार सागर बोरगे यांनी आरोपी अशोक पंडीत याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर तो पिंपरी चिंचवड परिसरात असल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलीस अंमलदार संदीप आगळे व तुकाराम सुतार यांनी तिथे मिळून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपी अशोक कैलास पंडीत याने धक्कादायक कबुली दिली–
त्याच्या पत्नीचे अजयकुमारसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून त्याने १७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता खोपडे नगरच्या डोंगराळ भागात त्याचा खून केला.
गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून हत्या केल्यानंतर मृतदेह गोणीत भरून ‘गुजर-निंबाळकरवाडी’च्या डोंगरात टाकून दिला.
आरोपीला सोबत घेऊन पोलीस पथकाने दाखवलेल्या ठिकाणी पाहणी केली.
झाडाझुडपात पांढऱ्या गोणीमध्ये अजयकुमार पंडीत याचा मृतदेह आढळला. यानंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी अशोक पंडीत याला अटक करण्यात आले आहे.
मिसिंगपासून खुनाचा उलगडा.
आरोपीचा शोध.
कबुलीजबाब.
मृतदेहाचा शोध.
गुन्हा दाखल आणि अटक.
ही संपूर्ण कारवाई भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत पूर्ण केली.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, स.पो.नि. स्नेहल थोरात, समीर शेंडे, स्वप्नील पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवी जाधव पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, दिपक फसाळे, सचिन सरपाले, संदीप आगळे, तुकाराम सुतार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, अवधुत जमदाडे, मंगेश गायकवाड, किरण सावळे, नवनाथ खताळ, निलेश खैरमोडे यांच्या पथकाने केली आहे.




















