Homeक्राईमधक्कादायक! धनकवडी तळजाई बसस्टॉपवर ५० वर्षीय मजुराची दिवसाढवळ्या आत्महत्या; सहकारनगर पोलिसांकडून तपास...

धक्कादायक! धनकवडी तळजाई बसस्टॉपवर ५० वर्षीय मजुराची दिवसाढवळ्या आत्महत्या; सहकारनगर पोलिसांकडून तपास सुरू

लोक वार्ता – राज राठोड

पुणे : धनकवडी, तळजाई परिसरात सोमवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. तळजाई शेवटच्या बस स्टॉपवर ५० वर्षीय मजुराने तीन-चाकी टेम्पोला कापडाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे नाव भास्कर लोखंडे (वय ५०, रा. तळजाई टेकडी) असे आहे. लोखंडे मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. पत्नीच्या मृत्यूनंतर ते बहुतेक वेळ घराबाहेर रहात होते. मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेपूर्वी त्यांनी एक तेलाचा डबा घेत तो जमिनीवर ठेवला व त्याच ठिकाणी तीन-चाकी टेम्पोला कापडाच्या सहाय्याने गळफास घेतला. दुपारी साधारण २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, यांनी दिलेल्या माहितीनुसार: लोखंडे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. ते मजुरीवर अवलंबून होते व अनेकदा घराबाहेरच राहायचे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही; मात्र ही घटना आत्महत्या असून हत्या नाही, हे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.”

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून, मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सहकारनगर पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!