Homeक्राईमघरफोडी, वाहन चोरी, मोबाईल जबरी चोरी करणारा, रेकॉर्डवरील सराईत आरोपीला बिबवेवाडी पोलिसांकडून...

घरफोडी, वाहन चोरी, मोबाईल जबरी चोरी करणारा, रेकॉर्डवरील सराईत आरोपीला बिबवेवाडी पोलिसांकडून अटक : आरोपीकडून १ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.

लोक वार्ता – राज राठोड

पुणे | घरफोडी, वाहन चोरी, मोबाईल जबरी चोरी अशा विविध गुन्ह्यांमध्ये असणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या आरोपीकडून तब्बल १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी फिर्यादी महिलेची मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासदरम्यान पोलीस अंमलदार आशिष गायकवाड व विशाल जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, १६ एकर मोकळ्या मैदानात एक संशयित व्यक्ती चोरीची गाडी घेऊन थांबलेला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा एक इसम संशयास्पद अवस्थेत आढळून आला. चौकशीअंती त्याची ओळख बाळू प्रभाकर चव्हाण (वय ३८, रा. सदाशिव चाळ, कान्दा मार्केट, जुन्नर एस.टी. स्टँडसमोर, पुणे) अशी पटली. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

अधिक चौकशीत त्याने मौजमजेसाठी व पैशांच्या गरजेसाठी दुचाकी मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तत्काळ त्याच्याकडून बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या गु.र.नं. २४३/२०२५ मधील चोरीस गेलेली मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली.

तसेच, आरोपीने जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतून दोन मोटारसायकली व १० मोबाइल फोन चोरी केल्याची आणि बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २२३/२०२५ मधील घरफोडी केल्याची माहिती पोलिसांना दिली. परिणामी विविध गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश असल्याचे उघड झाले.

या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण १लाख ८० हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस स्टेशनद्वारे सुरू आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर, श्रीमती नम्रता देसाई, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर श्रीमती अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सुरज बेंद्रे, यांचे सुचनेप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल माने, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, विनोद जाधव, संजय आग्रे, आशिष गायकवाड, विशाल जाधव, सुमित ताकपिरे, ज्योतिष काळे, शिवाजी येवले, रक्षित काळे, संतोष बनसुडे, दत्ता शेंद्रे व राहूल खाडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!