लोक वार्ता –राज राठोड
पुणे : घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–२, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी कात्रज पीएमपीएमएल बसडेपो परिसरातून सापळा रचून अटक केली आहे.

अधिक माहितीसाठी : दिनांक २/२/२०२६ ते ६/२/२०२६ दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या राहत्या घराचा कडी-कोयंडा कशानेतरी उचकटून घरातील सोने, चांदी व रोख रक्कम असा एकूण २४ लाख ४८ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता. या घटनेप्रकरणी येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना दिनांक ११/०२/२०२६ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–२ चे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलीस अंमलदार परेश सावंत व विनायक येवले यांना गोपनीय बातमीदाराकडून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुमार रामचंद्र ठाकर (वय ३८ वर्षे, रा. फ्लॅट नं. १४, अशोक अपार्टमेंट, लेन नं. ३, दत्तनगर, आंबेगाव बु., पुणे) यास पीएमपीएमएल बसडेपो, कात्रज, पुणे येथून ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीकडून सदर गुन्ह्यातील
११५ ग्रॅम ७०० मिली वजनाचे सोन्याचे दागिने,
११२ ग्रॅम ८०० मिली वजनाचे चांदीचे दागिने,
तसेच ३५,००० रुपये रोख रक्कम,
असा एकूण १६ लाख ६५ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिस तपासात सदर आरोपीने हा गुन्हा त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले असून, पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे ३ श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री दत्ताराम बागवे, सहायक पोलीस निरीक्षक सी.बी. बेरड, पोलीस उपनिरीक्षक एस.जे.तानवडे, पोलीस अंमलदार कैलास चव्हाण, राजु पुणेकर, परेश सावंत, प्रफुल्ल मोरे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर यांनी उघडकीस आणला आहे.




















