लोक वार्ता – राज राठोड
पुणे: शहरात खळबळ माजवून देणाऱ्या कात्रज-मांगडेवाडी डोंगरदऱ्यातील महिलेच्या मृत्यूचा छडा लावण्यात पुणे गुन्हे शाखा युनिट– २ ला, यश आले आहे. ही आत्महत्या नसून रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांनी केलेला निर्घृण खून असल्याचे तपासात उघड झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी सहा आरोपींना अटक केली आहे.

अधिक माहितीसाठी :
दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी कात्रजमधील मांगडेवाडी येथील एका क्रशर खाणीतील खोल दरीमध्ये ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली होती. मात्र, मृतदेह ज्या निर्जन ठिकाणी सापडला, ते पाहता घातपाताचा संशय बळावला होता.
पोलिसांचे सीसीटीव्ही तपास:
घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या प्रभारी अधिकारी अश्विनी जगताप यांनी दोन पथके तयार केली.

घटनास्थळ डोंगराळ भागात असल्याने तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. पोलिसांनी डोंगरदऱ्याच्या परिसरातील ३ किमी अंतरावरील आणि महिलेच्या घराच्या परिसरातील तब्बल ९७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज गोळा केले. फुटेजमधून संशयास्पद वाटणारी ३५ वाहने बाजूला काढण्यात आली.
रिक्षाच्या ‘हूड’मुळे आरोपी जाळ्यात:
तपासादरम्यान भारतनगर, कात्रज येथे राहणारा रिक्षाचालक केशव कमलेश चौधरी (वय २०) याची रिक्षा संशयास्पद वाटली. पोलिसांनी बारकाईने निरीक्षण केले असता, त्याने त्याच्या रिक्षाच्या ‘हूड’मध्ये (वरचे कव्हर) जाणीवपूर्वक बदल केल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

असा घडला गुन्हा
मयत महिलेने कोंढवा ते कात्रज जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा समजून हात दाखवला होता. रिक्षामध्ये आधीच चालक केशव कमलेश चौधरी त्याचे रिक्षामध्ये, त्याचे नशेडी मित्र अब्दुल मोहमंद शेख, वय 23 वर्षे व सोनू लक्ष्मण पवार, वय 19 वर्ष दोन्ही रा. भारतनगर, रासकर पार्क पुणे असे होते.
महिलेने तिला कात्रज येथील सृष्टी हॉटेल येथे सोडण्यास सांगितले, मात्र आरोपींनी ‘शॉर्टकट’ असल्याचे सांगून तिला मांगडेवाडीच्या डोंगरात नेले. महिलेने मला इकडून का आणले म्हणून त्यांचेशी वाद केला तेव्हा, तिघांनी तिला मांगडेवाडी येथील खाणीतील दरीत फेकून देवून तिचा खून केल्याची कबुली दिली
अटक केलेले आरोपी
१. केशव कमलेश चौधरी (वय २०)
२. अब्दुल मोहम्मद शेख (वय २३)
३. सोनू लक्ष्मण पवार (वय १९)
४. महादेव अर्जुन व्होरडे
५. साई अमित पूजारी
६. सोहेल हनीफ खान
सदर प्रकारामध्ये वरील आरोपीचे मित्र महादेव अर्जुन व्होरडे, साई अमित पूजारी, सोहेल हनीफ खान यांचाही सहभाग असल्याचे तपासात प्रथमदर्शनी आढळून आल्याने लागलोच वरील ६ इसमाना
गुन्हे शाखा युनीट २ कडील पथकाने ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली त्यांना पुढील तपासकामी भारतीविद्यापीठ पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिल्यावरुन सदर प्रकरणी गुन्हा रजि.क्र.61/2026 बोएनएस 103(1),3(5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास चालू आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. सह. पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. पंकजदेशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे 1 श्री शैलेश संखे वांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सपोनि श्री अमोल रसाळ व युनिट 2 कडील सपोउनि/संजय जाधव, पो हवा/विजय पवार, नागनाथ राख, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, शंकर नेवसे, संतोष टकले, शंकरकुंभार, अजीम शेख, विनोद चव्हाण, सददाम तांबोळी, साधना ताम्हाणे, संदीप शिर्के, प्रविण उत्तेकर, ओकार कुंभार, विशाल दळवी, रुषीकेश व्यवहारे, संजय आबनावे, विनायक वगारे यांच्या पथकाने केली आहे.




















