लोक वार्ता – राज राठोड
पुणे : अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी शहरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाविरोधात ठोस कारवाई करत एका तरुणीची सुटका केली आहे.
या प्रकरणी दोन पुरुष एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे अनैतिक मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित कक्षाला समजले की, दोन इसम एजंट मुलींना आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी आणत असून, त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्री करून घेत आहेत. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ सापळा रचला.
पोलिसांनी आंबेगाव परिसरातील वॉव लॉज येथे अचानक छापा टाकला. छाप्यात आरोपींनी वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. कारवाईदरम्यान घटनास्थळी आवश्यक पुरावे देखील जप्त करण्यात आले.
कायदेशीर कारवाई:
या प्रकरणी आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६४/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम १४३(१)(२), ३(५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम १९५६ च्या कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांचा इशारा:
शहरात अनैतिक मानवी तस्करी व देहविक्रीविरोधात अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे-३, श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, दत्ताराम जाधव, रेश्मा कंक, अविनाश कोंडे, चालक श्रेणी उप निरीक्षक हिरेमठ, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे.




















